महाराष्ट्र

पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या विरोधात लातूर भाजयुमोचा निषेधात्मक मोर्चा काढून राज्य शासनाचा जाहीर निषेध

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्हा भाजप कडून आणि विशेषतः भाजप युवा मोर्चा कडून राज्यच्या तसेच लातूर मनपाच्या चुकीच्या निर्णयाविरुद्ध वेगवेगळे आंदोलन करून तीव्र विरीध / निषेध करत असतात. यात लातूर भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर आणि भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव प्रेरणा होनराव यांचा मोठा सक्रीय सहभाग असतो आणि

अभ्यासपूर्ण आणि प्रभावीपणे मुद्दे मांडून राज्याच्या आणि लातूर मनपा कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्तित करतात. दि.26 गुरुवारी यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल वरील 2 रू व डिझेलवरील 1.50 रुपयांनी कर कमी करून महाराष्ट्रातील जनतेची थट्टा केली आहे. तसेच पेट्रोल व डिझेलवरील लादलेला कर 50% नी कमी करावा या मागणी सह इतर मागण्यासाठी भारतीय

जनता युवा मोर्चाच्या वतीने लातूर भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रमेशअप्पा कराड आणि लातूरचे माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाअध्यक्ष गुरूनाथ मगे, भाजयुमोचे राष्ट्रीय सदस्य विवेकानंद उजळंबकर, भाजयुमोच्या प्रदेश सचिव प्रेरणा होणराव, भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाच्या विरोधात शहरातील

महात्मा गांधी चौक ते गंजगोलाई दरम्यान निषेधात्मक मोर्चा काढून राज्य शासनाचा जाहीर निषेध व्यक्‍त करण्यात आला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पेट्रोलचा दर 1 रू ने व डिझेलचा दर 1.50 रूपयानी कमी करून राज्यातील जनतेची थट्टा केलेली आहे. त्यामुळे पेट्रोलडिझेल वरील राज्याचा टॅक्स कमी करावा

इंधनावरील टॅक्स 50 टक्यानी कमी करावा या मागणीसाठी शहरातील महात्मा गांधी चौक ते गंज गोलाई दरम्यान राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्‍त करण्यात आला.

Most Popular

To Top