लातूर जिल्हा

निलंगा तालुक्यात 200 हून अधिक वर्‍हाडी मंडळींना लग्नाच्या जेवणातून विषबाधा

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालुक्यातील केदारपूर येथील एका लग्न समारंभ सोहळ्यातील जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे लग्न समारंभात आलेल्या 200 हून अधिक वर्‍हाडी मंडळींना अन्नातून विषबाधा झाली आहे.केदारपूर गावातील एका लग्न समारंभ सोहळा पार पडला.यात लग्नाला आलेल्या वर्‍हाडी मंडळींना लग्नात

जेवणं महागाचे पडले.जेवण झाल्यानंतर अनेकांना ञास होऊ लागल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ दाखल करण्यात आले.केदारपूर येथे रविवारी ( दि.22 रोजी ) दुपारच्या तिथीनुसार विवाह पार पडला.या विवाह सोहळ्यात अनेकांनी जेवणावर ताव मारला.जेवणानंतर वर्‍हाडी मंडळी आपाआपल्या गावी गेले संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान अनेकांना उलटया,जुलाब आणि

मळमळीचा ञास जाणवू लागला.विषबाधा झालेल्या सर्व वर्‍हाड्यांवर वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे कळाले.त्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.आता या सर्व वर्‍हाडी मंडळींची प्रकृृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डाॅक्टरांनी सांगितले दरम्यान या एका लग्न समारंभ

सोहळ्यात झालेल्या अन्न विषबाधेमुळे लग्नात आलेल्या वर्‍हाडींना मनस्ताप सहन करावा लागला आहे. एकंदर, निलंगा तालुक्यातील केदारपूर गावामध्ये एका लग्न समारंभ सोहळ्यातील अन्नातून विषबाधा झाल्याने अनेकांना याचा ञास सहन करावा लागत आहे याचे गुढ गुलदस्त्यात असल्याने एका लग्न समारंभाची खमंग चर्चा सद्यस्थितीला चालू आहे.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Most Popular

To Top