महाराष्ट्र

सत्यशोधक डॉ संतुजी रामजी लाड यांची जयंती पुण्यतिथी आणि सामाजिक पुरस्कार शासन स्तरावर सुरू करण्याची अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडची धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी

महाराष्ट्र खाकी (मुंबई) – सत्यशोधक डॉ संतुजी रामजी लाड यांची जयंती पुण्यतिथी शासन स्तरावर साजरी करुन त्यांचे नावे सामाजिक पुरस्कार सुरू करण्याची अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनजय मुंढे यांच्या कडे मागणी करण्यात आली आहे. अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडचे महासचिव अँड अमितकुमार कोथमिरे यांनी राज्याचे

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनजंय मुंढे यांच्या कडे मुंबई येथील मंत्रालयातील त्यांच्या दालनात निवेदनाद्वारे व संजय बनसोडे , राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शिफारस पत्रासह सत्यशोधक समाजाचे अग्रदूत तथा महात्मा जोतिबा फुले यांचे सहकारी, शिष्य, हिंदु खाटीक समाजभुषण सत्यशोधक डॉ संतुजी रामजी लाड यांनी उभे आयुष्य

बहुजन समाजाच्या जागृतिसाठी संघटन कामी आयुष्य वेचलं म्हणूनच खासदार शरद पवार ,यांच्या लोक माझे सांगाती, राजकीय आत्मकथेत व जवळपास 15 विविध ग्रंथ, पुस्तकातून डॉ संतुजी रामजी लाड यांच्या जीवन कार्याचा नामोल्लेख गौरव करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री डॉ विरेंद्रकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ आंबेडकर

फाऊंडेशन अंतर्गत डॉ संतुजी रामजी लाड यांचा महामानवाच्या यादीत समावेश करून जयंती पुण्यतिथी साजरी करण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार असल्याचे दि 13/04/2022 चे परिपत्रक मंत्री धनंजय मुंढे यांना निदर्शनास आणून दिले आहे. सत्यशोधक बहुजन चळवळीतील डॉ संतुजी रामजी लाड यांची जयंती,पुण्यतिथी शासन स्तरावर साजरी करण्यात यावी व

तसेच सामाजिक क्षेत्रातील भरीव कार्य, जाती निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, सर्वधर्म सदभाव वाढीचे कार्य, महीला बाल कल्याण, आदिवासी, वैद्यकीय सेवेतील कार्यासाठी डॉ संतुजी रामजी लाड यांच्या नावे सामाजिक पुरस्कार सुरू करून अनुसूचित जाती प्रवर्गातील महाराष्ट्रातील खाटीक समाजाला न्याय द्यावा ही विनंती करण्यात आली आहे यावेळी महासचिव अँड अमितकुमार कोथमिरे,महाराष्ट्र खाटीक समाजाचे नेते अँड व्यकटराव बेंद्रे, विनोद गायकवाड आदी उपस्थित होते

Most Popular

To Top