लातूर जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणूका भाजपा ताकतीने लढणार भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍याच्‍या बैठकीत निर्धार

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रशांत साळुंके ) – येणाऱ्या काळात होवू घातलेल्‍या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेच्‍या निवडणूका कधीही होवू शकतात या सर्व निवडणूका कार्यकर्त्‍याच्‍या असून ज्‍या कार्यकर्त्‍याच्‍या मेहनतीवर यशाची शिखरे गाठली. पक्षाचा विचार, ध्‍येयधोरण तळागाळातील सर्वसामान्‍यांसह मतदारापर्यंत पोंहचविणाऱ्या कार्यकर्त्‍यासाठी भारतीय जनता पार्टी

जिल्‍हा परिषद, पंचायत समितीसह सर्व निवडणूका ताकतीने लढणार असा निर्धार भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्‍याच्‍या बैठकीत करण्‍यात आला. बैठकीच्‍या अध्‍यक्षस्‍थानी आ. रमेशअप्‍पा कराड हे होते. लातूर येथील विष्‍णुदास मंगल कार्यालयात लातूर जिल्‍हा भारतीय जनता पार्टीच्‍या वतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या बैठकीस जिल्‍हयाचे माजी पालकमंत्री

आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी कृषी राज्‍यमंत्री आ. सदाभाऊ खोत, खा. सुधाकर शृंगारे, आ. अभिमन्‍यू पवार, विनायकराव पाटील,प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, सुधाकर भालेराव, गणेशदादा हाके, दिलीपराव देशमुख, सुनिल गायकवाड, गोविंदअण्‍णा केंद्रे, बब्रूवान खंदाडे, विक्रम शिंदे, राहूल केंद्रे, संतोषअप्‍पा मुक्‍ता, रामचंद्र तिरूके, त्र्यंबक गुट्टे, पंडीतराव सुर्यवंशी, भागवत

सोट, मिनाक्षी पाटील, जयश्री पाटील, बापूराव राठोड, रेखाताई तरडे, उत्‍तरा कलबुर्गे, बालाजी गवारे, शामल कारामुंगे, संध्‍या जैन, दगडू साळूंके, ज्ञानेश्‍वर चेवले यांची व्‍यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी जिल्‍हयातील भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि प्रमुख कार्यकर्त्‍यांची मोठी संख्‍या होती.

लोकांच्‍या प्रश्‍नासाठी झगडा – यावेळी बोलताना माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर म्‍हणाले की, गेल्‍या निवडणूकीत राज्‍यात आपले सरकार होते. सर्वजण ताकतीने लढलो त्‍यामुळेच आपल्‍याला यश मिळाले. याचे श्रेय एकटयाचे नसून सर्वांचे होते. विविध प्रश्‍नाला वाचा फोडणाऱ्या सोबत जनता जाते. जिल्‍हयात आजही गाळपाअभावी ऊस मोठया प्रमाणात उभा आहे यासह

सोयाबीनच्‍या बियाणाचा काळा बाजार होणार नाही यासाठी कार्यकर्त्‍यांनी पक्षाच्‍या आदेशाची वाट न पाहता जनतेच्‍या प्रश्‍नांसाठी रस्‍त्‍यावर उतरले पाहीजे. भाजपाची मोठी ताकद असून नेत्‍याच्‍या अवतीभोवती फिरल्‍याने उमेदवारी मिळेल या भ्रमात कोणीही राहू नये. जो लोकाच्‍या प्रश्‍नांसाठी झगडतो त्‍यांनाच पक्ष उमेदवारी देईल असे बोलून दाखविले.

येणारी जिल्‍हा परिषद भाजपाचीच असेल – जिल्‍हयातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेच्‍या निवडणूका सोप्‍या आहेत. जो जमिनीशी जोडला जातो तोच मजबूत राहतो, पैशाने जोडलेला पालकमंत्री मजबूत राहू शकत नाही. गेल्‍या अडीच वर्षात कोरोनासह वेळोवेळी आलेल्‍या संकटात पालकमंत्री जनतेत आले नाहीत. मात्र प्रत्‍येकवेळी भाजपाच्‍या कार्यकर्त्‍यांनी अडचणीत संकटात

सापडलेल्‍यांना वेळोवेळी मदत केली आहे. असे सांगून येणारी जिल्‍हा परिषद ही कोणत्‍याही परिस्थितीत भाजपाचीच असेल असे आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी बोलून दाखविले.

भाजपाची भक्‍कम ताकद – यावेळी बोलताना आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, विकासाची गंगा काय असते हे पंत्रप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशवासीयांना दाखवून दिले. देशाचे नेतृत्‍व करणारे नरेंद्रजी मोदी जगातील लोकप्रिय नेते आहेत. त्‍यांच्‍या नेतृत्‍वातील पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत हा अभिमान आहे. ओबीसी आणि मराठा दोन्‍ही आरक्षण घालवण्‍याचे काम

महाविकास आघाडी सरकारने केले असून कोणतेही विकास कामे न करता केवळ वसुली करणाऱ्या या सरकारवर राज्‍यातील जनता असंतूष्‍ट आहे. गेल्‍या पाच वर्षात लातूर जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमातून विकासाची अनेक कामे झाली. अनेक योजना गावागावापर्यंत पोंहचल्‍या. गरजूंना विविध योजनेचा लाभ मिळाला. जिल्‍हयात भाजपाची भक्‍कम ताकद असल्‍याने स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेच्‍या निवडणूकीत भाजपाला विजयापासून कोणीही रोखू शकत नाही.

भाजपाचा 51 प्‍लस संकल्‍प – कार्यकर्त्‍यांच्‍या मेहनतीने पक्षाची ताकद जिल्‍हाभरात उभी झाली. पक्षाचा विचार गावागावात पोंहचविणाऱ्या कार्यकर्त्‍याला न्‍याय देण्‍यासाठी जीवाचे रान करू असे सांगून आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, निवडणूका कधीही होतील कार्यकर्त्‍यांनी आजपासूनच कमळ हेच उमेदवार समजून कामाला लागावे. जिल्‍हा परिषदेत 51 प्‍लस हा भाजपाचा संकल्‍प

असून ज्‍या विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक सदस्‍य निवडून येतील त्‍या मतदार संघाला जिल्‍हा परिषद अध्‍यक्षाचा मान मिळेल असे बोलून दाखविले. शेतकरी, शेतमजूर, कामगार, व्‍यापारी, विद्यार्थी यांच्‍यासह सर्व सामान्‍य जनता महाविकास आघाडी सरकारवर वैतागली आहे. अतिरिक्‍त ऊस, शेतकरी आत्‍महत्‍या, विज टंचाई, आरक्षण आदी प्रश्‍न राज्‍यात गंभीर बनले असून राज्‍य

सरकार याकडे जाणीवपुर्वक डोळेझाक करीत असल्‍याचा आरोप माजी कृषीमंत्री आ. सदाभाऊ खोत यांनी केला. तर खा. सुधाकर शृंगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वातील केंद्र शासनाने राबविलेल्‍या विविध योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोंहचवाव्‍यात असे आवाहन करून निवडणूक कशी जिंकावी याबाबतचा सल्‍ला कार्यकर्त्‍यांना दिला. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे.

त्‍यांच्‍या मेहनतीवर पक्ष आणि नेता मोठा होतो त्‍यामुळे येणाऱ्या निवडणूकीत पक्ष जो आदेश देईल त्‍यानुसार काम करून कार्यकर्त्‍यांना मान सन्‍मान मिळवून देवू असे आ. अभिमन्‍यू पवार यांनी बोलून दाखविले. या बैठकीत भाजपाचे प्रदेश उपाध्‍यक्ष विनायकराव पाटील, प्रदेश प्रवक्‍ते गणेशदादा हाके, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्‍यक्ष सुधाकर भालेराव, जेष्‍ठ मार्गदर्शक

गोविंदअण्‍णा केंद्रे, किसान मोर्चाचे दिलीपराव देशमुख, माजी खासदार सुनिल गायकवाड, बापुराव राठोड, जयश्री पाटील, उत्‍तरा कलबुर्गे, रेखाताई तरडे, मिनाक्षी पाटील, उषा रोडगे यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. बैठकीचे सुत्रसंचलन भाजपाचे जिल्‍हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे यांनी केले. मराठा आणि ओबीसी समाज बांधवाचे हक्‍काचे आरक्षण राज्‍यातील महाविकास आघाडी

सरकारच्‍या निष्क्रियतेमुळे गमवावे लागले याचा निषेध आणि भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गेल्‍या 14 एप्रिल रोजी सर्वात मोठी जयंती लातूरात साजरी झाली यासाठी पुढाकार घेतल्‍याबद्दल खा. सुधाकर शृंगारे यांचे अभिनंदन करणारा संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मांडलेला ठराव या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्‍यात आला.

Recent Posts