महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा विधानसभा मतदार संघातील निलंगा,देवणी,शिरूर अनंतपाळ येथील कृृषी अधिकार्यांची खरीप हंगाम पेरणीपूर्व माजी पालकमंञी तथा आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा येथे बैढक घेऊन अधिकार्यांना सूचना केल्या. खरीपाच्या पेरण्या कांही दिवसांवर येउन ठेपल्या आहेत.त्या पार्श्वभूमीवर शनिवार (दि.14) रोजी
निलंगा येथे कृृषी विभागाची बैढक घेऊन निलंगा मतदार संघातील तिन्ही तालुक्यातील शेतकर्यांना खरीपाचे बि-बियाणे व खते कमी पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी तसेच खरीप हंगामात शेतकर्यांना पेरणी संदर्भात कसलीही अडचण येणार नाही,यावर उपाययोजना करून राज्य शासनाकडे अहवाल पाठवून मुबलक दर्जेदार बि-बियाणे व खते उपलब्ध करावेत,अशा सूचना या
आढावा बैठकीत उपस्थित अधिकार्यांना माजी पालकमंञी तथा आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिल्या. तसेच, विशेषत: सोयाबीन व तुरीचे उत्पन्न वाढ करण्यासंदर्भात मंडळनिहाय अधिकार्यांशी चर्चा करून त्यावर उपाय सुचवले.बि-बियाणे व खते यांचा तुटवडा होणार नाही.
बोगस बि-बियाणे व खते शेतकर्यांना द्याल तर खबरदार याकडे शासनाने लक्ष घालून वेळेत व चांगले खरीप साहित्य मिळाले पाहिजे, अशा सूचनाही केल्या. शेतकरी बांधवांना सोयाबीन व तुरीचे उत्पन्न वाढवणे बाबत माहिती तसेच मार्गदर्शन करण्याविषयी प्रशाननाला सूचना दिल्या. याचबरोबर खरीप हंगामपूर्व खते,बि-बियाणे यांच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. याप्रसंगी,उपविभागीय कृृृृषी
अधिकारी राजेंद्र कदम,निलंगा तालुका कृृृषी अधिकारी राजेंद्र काळे,शिरूर अनंतपाळ तालुका कृृृषी अधिकारी लक्ष्मण खताळ,देवणी तालुका कृषी अधिकारी संजय नाब्दे आदींची उपस्थिती होती.