लातूर जिल्ह्यात पायाभूत सोयी – सुविधा आणि लोककल्याणकारी योजनांची कोवीड काळात आणि कोविड नंतर अंमलबजावणी – पालकमंत्री अमित देशमुख

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) –  कोविड काळात आणि कोविड नंतर जिल्ह्यात पायाभूत सोय सुविधा आणि लोक कल्याणकारी योजनांची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करण्यात आली त्यामुळे जिल्ह्यातील विकासाल गती मिळाली. यापुढेही सर्वांच्या सहकार्याने लातूर जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देवू असे प्रतिपादन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले. आज (दि.1 मे) जिल्हा क्रिडा

संकूल येथे महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांना उद्देशून त्यांनी शुभेच्छा संदेश दिला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे,जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, मनपा आयुक्त अमन मित्तल, पदाधिकारी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, विविध

विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी जिल्ह्यातील लसीकरणाला गती देण्याची आवश्यकता सांगून कोविडच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले, हे संकट टाळायचे असेल तर, मास्क, हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे पुन्हा सुरु करावे लागेल. अधिकाधिक नागरिकांना लस घेण्याचे प्रशासनाने

वेळोवेळी आवाहन केले आहे. अजूनही लस वितरण सुरु आहे. सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कोविडच्या काळातही आणि कोविडनंतर शासनाने जी कामे केली. त्यात पायाभूत सोयीसुविधा पासून ते अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या. त्यात मार्च, 2022 अखेर प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतंर्गत 56 हजार 613 उद्दिष्टापेक्षा अधिक 59 हजार

761 लाभार्थ्यांना रुपये 23 कोटी 45 लाख 35 हजार रुपयांचा लाभ देण्यात आलेला असल्याचे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले. 14 हजार 776 घरकुलांना मंजूरी – रमाई घरकुल आवास योजनेंतर्गत लातूर जिल्हयामध्ये नागरी व ग्रामीण क्षेत्रामध्ये मागच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये एकूण 14 हजार 776 घरकुलांना मंजूरी देण्यात आल्याची माहिती सांगून यशवंतराव चव्हाण मुक्त

वसाहत व धनगर समाज विशेष कार्यक्रम विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गाच्या नागरिकांचे घरे बांधण्यासाठी 6 सप्टेंबर 2019 पासून जी वैयक्तीक लाभाची योजना सुरु झालेली आहे, त्या योजनेंतर्गत जिल्ह्यात आज अखेर 6 हजार 660  लाभार्थ्यांची निवड करुन मंजूरी प्रदान करण्यात आल्याचे सांगितले. तसेच प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गंत 4 हजार 446 इतकी घरकुल

मंजूर करण्यात आल्याची माहितीही दिली. लातूर जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत सन 2021-22 मध्ये रु. 123 कोटी 54 लाखापेक्षा अधिक इतका निधी खर्च झालेला असून या योजनेंतर्गत 36 हजार 108 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आल्याचे सांगितले. नगरोत्थान अभियान योजनेतून 68 कोटींची कामे – महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्था‍न राज्यस्तरीय अभियानांतर्गत लातूर

शहराच्या 1 ते 18 प्रभागामधील रस्ते हॉटमिक्स करणे, नाल्या व मोठे नाले बांधणे यासाठी नगर विकास विभागाकडून 68 कोटींला मंजूरी दिली असून याची निविदा प्रक्रिया चालू असल्याचे सांगून नागरी दलीतेत्तर वस्ती सुधारणा योजनेतंर्गत सन 2020-21 मध्ये 5 कोटी 66 लक्ष रूपयांच्या कामास प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. तसेच याअंतर्गत शहरात विविध ठिकाणी CCTV

यंत्रणा बसविणे, जुनी रेल्वेलाईन रस्त्यावरील डिव्हायडरची रूंदी कमी करून नवीन डिव्हायडर करणे, शहरातील इतर विकास कामे असे एकूण 50 कामे प्रास्तावित असल्याचे सांगितले. अनुसूचित जाती व नवबौध्द वस्ती सुधार योजनेसाठी 20 कोटी – लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी अनुसूचित जाती व नवबौध्द वस्ती सुधार या योजनेंतर्गत सन 2020-21 मध्ये 20 कोटी

रूपये प्राप्त झाले असून 15 कोटी 16 लक्ष रूपयांच्या 142 कामांना प्रशासकीय मंजूरी प्राप्त असून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहितीही त्यांनी आपल्या शुभ संदेशपर भाषणात दिली. किमान कौशल्य विकास कार्यक्रम – किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2021-22 या जिल्हा सर्वसाधारण वार्षिक  योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यात एकूण 230 प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण

प्रगतीपथावर असल्याचे सांगून छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता विकास अभियानांतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे राबवण्यात येणाऱ्या एकूण तीन योजनांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात लाभ देण्यात आल्याची महत्वपूर्ण माहिती त्यांनी यावेळी दिली. – जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत – मागच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले

होते. कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनेमध्ये सन 2021-2022 प्रधानमंञी पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील अधिसुचित पिकासाठी 9 लाख 60 हजार 536 पिक विमा अर्ज करुन शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. प्रधानमंञी खरीप पिक विमा योजना मधील शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई पोटी रक्कम रु. 35 कोटी 71 लाख एवढी रक्कम

78 हजार 405 शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आली आहे. जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर, 2021 या कालावधीत अतिवृष्टी व पुर परिस्थिमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात 5 लाख 7 हजार 499 बाधित शेतकऱ्यांना 431.79 कोटी इतका निधी शासनाकडून वाटप करण्यात आल्याचे सांगून ई-पीक पाहणी हा कार्यक्रम दिनांक 15 ऑगस्ट, 2021 पासून संपूर्ण

राज्यात राबविण्यात येत आहे. सन 2021-2022 मध्ये लातूर जिल्ह्यातील 2 लाख 69 हजार 128 शेतकऱ्यांच्या 3 लाख 25 हजार 158 हेक्टर आर क्षेत्राची मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी नोंद केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 282 गावाची निवड करण्यात आलेली असुन त्यापैकी एकुण 277 गावाची रुपये 447

कोटी 51 लाख रूपये रकमेचे गाव विकास आराखडे मंजूर झाल्याचे पालकमंत्री यांनी अधोरेखित केले. जिल्हा परिषदेच्या शंभर टक्के शाळा डिजीटल – जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शंभर टक्के शाळा डिजीटल करण्यात आलेल्या आहेत. दिव्यांग मुलांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी राज्यात आदर्श ठरावे असे उमंग ऑटिझम सेंटरची लातूर

येथे उभारणी करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांच्या 3 हजार 117 वारसांना आर्थिक मदत – जिल्ह्यातील कोविडमुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या निकटच्या वारसांना रुपये 50 हजार इतके सानुगृह अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला. त्यानुसार लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 3 हजार 117 इतक्या मयत व्यक्तींच्या वारसांना मदतनिधी

डी.बी.टी. द्वारे थेट त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात राज्य शासनाकडून वितरीत करण्यात आल्याचे सांगून महिला व बाल विकास विभागातंर्गत जिल्ह्यातील कोविडमुळे मृत्यू झालेल्या 8 अनाथ बालकांना पंतप्रधान सहाय्यता योजनेतंर्गत 10 लाख रुपयांची मुदत ठेव जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त पोस्ट ऑफिस खात्यावर तर मुख्यमंत्री सहाय्यता योजनेतंर्गत 5 लाख मुदत ठेव जिल्हा

महिला व बाल विकास अधिकारी यांच्या संयुक्त राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यात समाज कल्याण विभागाचे सर्वाधिक शासकीय वसतीगृहे – सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह योजनेतंर्गत महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लातूर जिल्ह्यामध्ये 13 मुलांचे व 12 मुलींचे असे एकूण 25 शासकीय वसतिगृहे कार्यान्वित असून विद्यार्थी प्रवेश

क्षमता 2 हजार 790 इतकी आहे. या वसतिगृहामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन व्यवस्था केली जाते. तसेच शैक्षणिक साहित्य व निर्वाह भत्ता प्रदान करण्यात येतोत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील महाविद्यालयात शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना

शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो.सन 2020-212021-22 मध्ये एकूण 1 हजार 821 विद्यार्थ्यांना रुपये 363.33 लक्ष इतक्या रकमेचा लाभ देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी दिली.

Recent Posts
07:06