लातूरचे मा.खा. डॉ.सुनील गायकवाड यांना लीजेंड दादासाहेब फाळके आवार्ड घोषित

महाराष्ट्र खाकी ( मुंबई ) – लातूर लोकसभेचे सोळाव्या लोकसभेत भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय संसदरत्न खासदार प्रोफेसर डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना कृष्णा चव्हाण फाउंडेशन मुंबई यांच्याकडून दिला जाणारा अत्यंत सन्मानाचा पुरस्कार “लीजेंड दादासाहेब फालके आवार्ड,2022” हा पुरस्कार मुंबई येथे 4 मे रोजी एका शानदार पुरस्कार समारोह

कार्यक्रमात मान्यवराच्या हस्ते दिला जाणार आहे.
संसदरत्न माजी खासदार प्रोफेसर डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी सोळाव्या लोकसभेत अनेक महत्त्वपूर्ण कामे केली.लोकसभा मतदार संघात विकास कामे तर केलीच परंतु देश पातळीवरील अनेक प्रश्न लोकसभेत मांडण्याचे काम केले. विदेशात ही भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे काम केले. प्रामुख्याने भारत सरकारच्या

“इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्टॅंडिंग कमिटीच्या” सदस्यपदी असताना देशामध्ये ऑप्टिकल फायबर चे काम आणि एमटीएनएल बीएसएनएलच्या मोबाईल नेटवर्क साठी विशेष प्रयत्न करून महत्त्वपूर्ण काम केल्याबद्दल आणि लातूर लोकसभा मतदारसंघात रेल्वेनी पाणी आणल्याबद्दल, रेल्वे बोगी कारखाना, अनेक नवीन रेल्वे सुरू केल्या.पासपोर्ट कार्यालय, पोस्टाचे विभागीय

कार्यालय ,नीट एक्झाम सेंटर, आदी महत्त्वपूर्ण कामाबरोबर लातूर शहरांमध्ये “सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल” रत्नागिरी ते नागपूर,राष्ट्रीय महामार्ग टेंभुर्णी ते लातूर राष्ट्रीय महामार्ग,अशा अनेक कामाचा पाठपुरावा करून त्यांनी जनतेची सेवा केली आहे.या सर्व कामाची दखल घेऊन कृष्णा चव्हाण फाउंडेशन (केसीएफ) मुम्बई या संस्थेकडून लिजेंड दादासाहेब फाल्के अवार्ड मान्यवराच्या हस्ते दिला

जाणार आहे. या कार्यक्रमासाठी डॉ. सुनील गायकवाड यांना हा पुरस्कार तर दिलेलाच आहे परंतु या अवार्ड कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित राहण्याचे पत्रही डॉ. गायकवाड यांना आले आहे. डॉ. गायकवाड यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत बॉलीवुड क्षेत्रातील हा मानाचा पुरस्कार त्यांनी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल याठिकाणी दिला जाणार आहे.त्याबद्दल त्यांच्या मित्र परिवाराकडून डॉ. गायकवाड यांचे हार्दिक अभिनंदन केले जात आहे.

Recent Posts