लातूर जिल्हा

लातूर (लोदगा) येथील बांबू रोपे निर्मिती प्रयोगशाळेचे लोकार्पण केंद्रीय गृृृहमंञी अमित शहा यांच्या हस्ते दि. 5 मेला

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रशांत साळुंके ) – लातूर पर्यावरण अभ्यासक तथा बांबू लागवड चळवळीचे प्रणेते माजी आ.पाशा पटेल राबवित असलेल्या बांबू लागवड या पर्यावरणपूरक चळवळीची दखल केंद्र सरकारनेही घेतली असून,या क्षेञातील त्यांची तळमळ पाहता फिनिक्स फाउंडेशनच्या माध्यमातून लोदगा ( ता.औसा जि.लातूर ) येथे उभारण्यात आलेल्या बांबू रोपे निर्मितीची टिशू कल्चर

प्रयोगशाळा,बांबूपासून टूथब्रश निर्मितीचा कारखाना आणि इतर महत्त्वपूर्ण योजनांचे लोकार्पण करण्यासाठी खुद्द केंद्रीय गृृहमंञी अमित शहा हे दि.5 मे रोजी येत आहेत.याप्रसंगी बांबूशी निगडीत विविध घटकांचे शहा यांच्या उपस्थितीत सादरीकरण केले जाणार आहे. सदरील,लोदगा येथील लोकार्पण आणि उद्गघाटन सोहळा दि.10 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता.माञ,माजी आ.पाशा पटेल यांचा वाढदिवस दि. 5

मे रोजी असल्याने हा कार्यक्रम दि.5 मे रोजी आयोजित करण्यास संहमती मिळावी,अशी विनंती त्यांनी केंद्रीय गृृृहमंञी अमित शहा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली असता,त्यांनी तत्त्वता मान्यता दिली.यावेळी पाशा पटेल यांनी बांबूपासून तयार होणारे कपडे,टी-शर्ट आदींची सविस्तर माहिती देऊन त्यांना टी-शर्ट भेट दिला.इथेनाॅल

संदर्भात सविस्तर चर्चा केली.बांबूचा सहकारात समावेश करावा,अशी विनंती केली असता त्यांनी सकारात्मकता प्रतिसाद दिला.लोदगा येथे प्रत्यक्षात आल्यानंतर शेतकर्‍यांच्या फायद्याचे अनेक निर्णय त्यांच्याकडून जाहीर होण्याची शक्यता पाशा पटेल यांनी व्यक्त करून,अमित शहा यांनी आपणास अपेक्षित होते त्यापेक्षा कितीतरी पटीने आपण मांडलेले मुद्दे गांर्भीयाने घेतले,अशी माहिती पाशा पटेल यांनी दिली.

या हंगामात 1 कोटी बांबूची रोपे लागवडीचा दिला शब्द
– याप्रसंगी चर्चेदरम्यान केंद्रीय गृृहमंञी अमित शहा यांनी बांबू लागवड चळावळीची माहिती जाणून घेत,या हंगामात बांबूची किती रोपे लावली जाणार,असा प्रश्न त्यांनी केला असता किमान 1 कोटी रोपे लागवडीचा शब्द पाशा पटेल यांनी अमित शहा यांना दिला.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Most Popular

To Top