महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर शहरात मागील काही दिवसापासून काही युवक उघड्यावर मोकळ्या जागे मध्ये, रस्त्याच्या कडेला,अंधाराचा फायदा घेऊन मद्यपान व नशापाणी करीत असताना आढळून आले होते. त्यावरून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे आदेशावरून परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांचे नेतृत्वात लातूर शहरांमध्ये उघड्यावर बसून मद्यपान करणारे व आरडाओरडा करून सामाजिक शांतता बाधित करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी दिनांक 4 मार्च चे संध्याकाळी विशेष मोहीम लातूर पोलिसांकडून राबविण्यात आली होती हि मोहिमेकरिता शीघ्र कृती दलाचे जवान,
दंगा नियंत्रण पोलीस पथकाचे प्लाटून तसेच विवेकानंद पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस उपनिरीक्षक जिलानी मानूल्ला तसेच पोलीस अमलदार यांच्यासह परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी स्वतःचे मार्गदर्शनात विविध पथके तयार करून एकाच वेळी पोलीस ठाणे शिवाजी नगर, गांधी चौक व विवेकानंद हद्दीतील वेगवेगळ्या भागात फिरून उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या लोकांची धर-पकड केली.
या मोहिमेत लातूर शहरातील विविध भागात उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या व खाजगी क्लासेस भागातील विनाकारण फिरणाऱ्या 40 युवकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर 110/117 प्रमाणे कारवाई करण्यात आली. तसेच पोलीस ठाणे गांधी चौक हद्दीत ग्रेन मार्केट एरियामध्ये वीनापास परवाना बेकायदेशीररित्या ताडीचा गुप्ता चालवणारे व ताडी पिताना मिळून आल्याने एकूण 7 लोकावर पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 112/ 2022 कलम 65, व कलम 68,81,83 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशा प्रकारची कार्यवाही यानंतरही पुढे चालू राहणार असून उघड्यावर मद्यप्राशन करून सामाजिक शांतता भंग करणारे व्यक्तींची माहिती डायल 112 किंवा संबंधित पोलिस स्टेशनला देण्यात यावी. जेणेकरून सदर मद्यपी लोकांवर कारवाई करण्यात येईल.