महाराष्ट्र खाकी ( मंगळवेढा ) – लातूर जिल्ह्याचे माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी जाती भेद विकासाचे राजकारण केले आणि करत आहेत. समाजातील प्रत्येक वर्गाला न्याय देण्याचे आणि आपल्या मतदार संघातील प्रश्न अभ्यासपूर्ण मांडून त्याचा पाठपुरावा करून विकासकामे केले आहेत. डॉ. सुनील गायकवाड यांनी संत चोखोबा ते संत तुकोबा – एक वारी समतेची या वारीच्या शुभारंभ लातूर चे माज़ी ख़ासदार प्रोफ़ेसर डॉ सुनील बलिराम गायकवाड़, राष्ट्रीय अध्यक्ष विश्व दलित परिषद च्या हस्ते श्री संत चोखामेळा समाधी मंदिर,मंगळवेढ़ा यांच्या समाधीची पूजा करुण समतेची वारी चा उद्घाटन करन्यात आले.
डॉ सुनील बळीराम गायकवाड आपल्या मनोगतात म्हणाले की मंगळवेढा ही संतांची भूमी आहे इथे अनेक संत होऊन गेले. महाराष्ट्राच्या इतिहासात श्री संत चोखामेळा यांचे एकमेव घराणे आहे ज्या घरातील पाच संत आहेत.श्री संत चोखोबा हे 13 व्या शतकातील एक महान संत आहेत. त्या काळात ते अस्पृश्य समाजातील महार जातीचे असल्याने त्यांना विठ्ठला च्या मंदिरात कधीच जाता आले नाही. पण अनेक अभंग लिहून त्यांनी सामाजिक समता साठी काम केले अशा महान संताची ही भूमी आहे.इथे भव्य असे स्मारक मंदिर श्री संत चोखामेळा यांचे झालेच पाहिजे या साठी मी स्वतः भारत सरकार कडे पाठपुरावा करून आपण सी एस आर फंड मिळवण्याचा प्रयत्न करू आणि भव्य असे स्मारक मंदिर उभा करू असे म्हणाले.
या कामी स्थानिक आमदार समाधान औताडे आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी लक्ष घालावे असे ही आवर्जून म्हणाले.
विशेष म्हणजे सचिन पाटील यांनी ही वारी समतेची चोखोबा ते तुकोबा असे नियोजन करून आज पासून चोखोबा च्या समाधी पासून सुरु करुन समारोप हा तुकोबाराय च्या समाधी वर समारोप करणार आहेत या कार्यक्रमा साठी प्रमुख पाहुणे म्हणून मला उपस्थीत राहण्याची संधी दिल्याबद्दल जाहीर आभार व्यक्त करून श्री संत चोखामेळा च्या अभ्यासन केंद्रावर काम करण्याची इच्छा ही प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी जगतगुरु संतशीरोमनी तुकोबाराय यांचे वंशज ह.भ.प.शिवाजीराव मोरे महाराज( श्री विट्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपुर सदस्य),सोलापुर चे माज़ी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, स्थानिक लोकप्रिय आमदार समाधान औताडे,प्रकाश महाराज,निशिकांत मरचंडराव,शशिकांत चव्हाण,नागसेन पुंडगे,दामोदर माने,समता वारी चे संयोजक सचिन पाटिल,मार्गदर्शक निलेश गद्रे आदि मान्यवर उपस्थित होते.