पोलीस

विवेकानंद चौक पोलिस स्टेशन , लातूर येथील एकुण 55 बेवारस दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनाचा लिलाव

 

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – विवेकानंद चौक पोलिस स्टेशन , लातूर येथील एकुण 55 बेवारस दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनाचे लिलाव करणेकामी नमुद वाहनाचे किंमती बाबत लेखी माहिती मिळणेसाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी, कार्यालय लातूर यांना पत्र व्यवहार करण्यात आला होता. त्याप्रमाणे त्यांच्याकडून संदर्भीय पत्रकान्वे बेवारस वाहनाचे किंमतीची लेखी माहिती प्राप्त झालेली आहे.

तरी विवेकानंद चौक पोलिस स्टेशन येथील एकुण 55 बेवारस वाहने यांचा लिलाव दि. 24 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वा. विवेकानंद चौक पोलिस स्टेशन लातूर येथे करण्यात येणार आहे, असे पोलीस निरीक्षक विवेकानंद चौक पोलिस स्टेशन, लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Most Popular

To Top