लातूर मनपाचे कचरा वेवस्थापन राज्यातील बाकी मनपानां दिशार्शक

 

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या नियोजनात लातूर शहर महानगरपालिकेला GFC 3 स्टार मानांकन मिळाले आणि काही दिवसापूर्वीच दिल्ली येथे शासकीय समारंभामध्ये गौरवण्यात ही आले . लातूर शहर महानगरपालिकेला देश पातळीवर मिळालेला पुरस्कार हे समस्त लातूरकर तसेच मनपा अधिकारी व स्वछता कर्मचाऱ्यांचे श्रेय आहे. शहर स्वच्छ ठेवण्यात जसे योग्य नियोजन गोजमगुंडे यांनी केले, आता त्याच पद्धतीने जमा झालेल्या कचरा वेवस्थापनेला नवीन चालना देऊन लातूर शहरा लगत असलेल्या वरवंटी कचरा डेपो व लँड फिल्ड येथे नवीन उपक्रम राबवन्यास महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी शुभारंभ आणि पाहणी केली. सोबत उपमहापौर चंद्रकांत बिराजदार आणि मनपा अधिकारी होते.

 

लातूर शहर महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या वरवंटी कचरा डेपो येथील नियंत्रण कक्षाच्या नूतनीकरण शुभारंभ महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. या आत्याधूनिक नियंत्रण कक्षामुळे परिसरातील कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात गतिमानता येणार आहे. CCTV , संगणकीकृत वजन काटा यामुळे प्रत्येक लहान सहान बाबींवर देखील नियंत्रण मिळवता येणार आहे.

लातूर मनपाच्या अंतर्गत राज्यातील पहिल्या ब्लॅक सोल्जर माशीच्या माध्यमातून कचऱ्यापासून खत निर्मिती प्रायोगिक प्रकल्प सुरु करणारी राज्यातील पहिली लातूर महानगरपालिका आहे. याचा फायदा जिल्ह्यातील शेकऱ्यांना होणार.

लातूर शहर महानगरपालिक कचरा डेपो येथे उभारण्यात आलेल्या. लातूर शहरातील मोठ्या हॉटेल मधून रात्रीच्या वेळी किचन वेस्ट संकलित करून या वराहांना खाण्यास दिले जाते. आणि वराह पालन प्रकल्प सुरवात केली आहे.असे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम मनपाच्या वतीने राबविण्यात येत आहेत याचे सर्व श्रेय महापौर विक्रांत गोजमगुंडे यांना जाते. त्यांच्या विकासाची दूरदृष्टी आणि योग्य नियोजनाना लातूर शहर महानगरपालिकेचे नाव देशात आणि राज्यात गाजत आहे. राज्यातील महानगरपालिकानी लातूर मनपाच्या या उपक्रमांचा आदर्श घेतला पाहिजे असे.

 

 

Recent Posts