महाराष्ट्र

किर्ती ऑईल मिल मध्ये आणखी एका कामगारांचा काम करताना मृत्यू

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्ह्यात कीर्ती ऑईल मिलचे मोठे प्रस्त आहे. या मिल मुळे जिल्ह्यातील अनेक लोकांना रोजगार मिळाला आहे. कीर्ती ऑईल मिल आता बाहेर प्रस्त निर्माण करण्याच्या मार्गांवर दिसत आहे. याचा प्रत्येक लातूरकराला अभिमान असेल आणि आहे. पण याच कीर्ती ऑईल मिल मुळे जिल्ह्यच्या विकासात, रोजगारात भर पडली तशीच मिल उभी करण्यात आणि मिल मुळे होणारे प्रदूषण आणि कामगारांचे जीव धोक्यात आहेत असे दिसून येत आहे.

त्याला करणे ही तशीच आहेत. मागील काही वर्षांपूर्वी कीर्ती ऑईल मिल मध्ये अपघात झाला आणि बरेच कामगार मृत्यूमुखी पडले होते आणि मिल मालकाने काही रक्कम त्यांच्या परिवाराला नुकसान भरपाई म्हणून दिली . नंतर आणखी एका घटनेत कीर्ती मिलचे नव चर्चेत आले एका सुरक्षा राक्षकाचा मृत्यू झाला ! आणि आता आणखी एका कामगारांचा काम करताना मृत्यू झाला आहे. या कामगारांच्या नातेवाईकांनी या मृत्यू बद्दल संशय व्यक्त केला आहे.

या सर्व प्रकारात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की यात मुख्य दोषी कोन मिल मालक, कामगार अधिकारी का MIDC प्रशासकीय विभाग कारण यात सर्वांनी आपली जबाबदारी नीट पाळली असती तरी असे अपघात घडले नसते ! कारण कामगार सुरक्षा उपाय योजना मिल मालकाने ठेवायला हव्या होत्या, या योजनेची पाहणी करणे प्रशासनाचे काम आहे म्हणजे संबंधित प्रशासकीय अधिकारी वेळोवेळी जाऊन सुरक्षा योजनाची आणि उपकारणाची पाहणी आणि ऑडिट करायला पाहिजे. कामगारांना या उपकारणाचे आणि योजनेची माहीती द्यायला पाहिजे पण असे काही दिसून येत नाही !

कामगार यांची सुरक्षेला दुय्यम स्थान देऊन कीर्ती ऑईल मिल मालकाने कामगारांच्या जीवाशी खेळ थांबवावा यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकारी ही तितकाच जिम्मेदार असायला पाहिजे ना? पण असे होत नाही कारण पैसे कामावण्याच्या नादात आणि पैशाच्या जीवावर आपले कोणीही काही वाकडे करू शकत नाही या भावनेने असे अपघात आणि कामगारांचे जीव जात राहतील! हे सर्व थांबायला पाहिजे या साठी महाराष्ट्र खाकी नक्कीच प्रयत्न करणार आणि बातम्याच्या माध्यमातून कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करत राहील.

Most Popular

To Top