महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर जिल्ह्यातील बरेच परिवार आहेत ज्यांचे देशाच्या,राज्याच्या आणि लातूरच्या राजकारणात, सामाजिक जीवनात आणि समाजाच्या विकासासाठी खूप मोठे योगदान आहे. त्यातील एक परिवार म्हणजे गायकवाड परिवार होय. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभलेले त्यांच्या सोबत सामाजिक काम केलेले, हैद्राबाद मुक्ती संग्राम मध्ये स्वातंत्र्यासाठी जेल मध्ये गेलेले पण स्वतंत्र सैनिक चा कुठलाच मोबदला न घेतलेले, कासार सिर्सी चे पहिले दलीत विद्यार्थी महाराष्ट्र शासनानी दोन वेळा “आदर्श शिक्षक”पुरस्कार देऊन गौरव केलेले परमपूज्यनिय दादा बळीराम शिवराम गायकवाड यांच्या नावानी लातूर
महानगपालिका ने त्यांच्या निवास स्थानाकडे जाणाऱ्या सरस्वती विद्यालयाच्या समोरील रस्त्याला आज त्यांच्या 91 व्या जयंती च्या निमित्त “दादा बळीराम शिवराम गायकवाड मार्ग”असे नामकरण देऊन त्यांचा गौरव केला आहे. नामकरण फलकाचे उद्घाटन लातूर महानरपालिका चे उप महापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे तत्कालीन सचिव अनिलकुमार बळीराम गायकवाड, लातूर महानरपालिका चे सदस्य तथा भारतीय जनता पार्टी चे शहर जिल्हा अध्यक्ष गुरुनाथ मगे,
माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड, प्रभाग ११ च्या नगर सेविका सौ रागिणीताई यादव, प्रभाग १२ चे नगर सेवक देवा भाऊ साळुंके, नगरसेवक प्रवीण अंबुलगेकर, ॲड गणेश गोमसाळे, भाजपा चे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर,अमोल गित्ते, नगरसेवक पपुजी देशमुख, दत्ता सोमवंशी,विजयकुमार बळीराम गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य रमाकांत बानाटे, पतंजली योग चे
युवा जिल्हाध्यक्ष अमर वाघमारे, सारंग वाघमारे, उद्योगपती सिध्देश्वर विसवेकर, संतोष कोचेटा, अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव चे अध्यक्ष राहुल क्षीरसागर, महार बटालियन चे माजी सुभेदार मुकुंद हलसे, माजी केंद्र प्रमुख पांडुरंग अंबुलगेकर, बिदर चे माजी शिक्षणाधिकारी जी. निवृतीराव, रेणापूर पंचायत समितीचे माजी सभापती रमेश सोनवणे, आदी मान्यवर उपस्थित होते.