महाराष्ट्र खाकी (देवणी) – जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर धाडी मारुन कार्यवाही करण्याचे सत्र सुरू आहे . लातूर जिल्ह्यात काही दिवसापूर्वी गांजा वाहतूक करणारी गाडी MIDC पोलिसांनकडून पकडण्यात आली होती. आणि लातूर LCB कडून गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनात शेतात जाऊन गांज्याची झाडे पकडली होती. अशीच एक कारवाई लातूर LCB तर्फे करण्यात आली आहेत.गजानन भातलवंडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर ( LCB )स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विळेगाव शेत शिवार गट नंबर 108/5 तालुका देवनी येथे छापा टाकून शेतात असलेली गांजाची 14 किलो 700 ग्रॅम वजनाची झाडे,किंमत अंदाजे 98,490/- रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि दोन इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी (LCB) स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांच्या फिर्याद वरून
1) सत्यवान रघुनाथ देवशेटवार
2) दामू लक्ष्मण पाटील,
हे दोघे राहणार विळेगाव यांच्या विरोधात पोलिस ठाणे देवनी येथे गुन्हा रजिस्टर नंबर. 211/2021 कलम 20 (अ), 20 (ब) , 2 (ब) गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS act ) 1985 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांची चाहूल लागताच वरील नमूद दोन आरोपी फरार झाले आहेत त्यांचा शोध सुरू आहे.
हि कारवाई लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा(LCB) लातूरचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, देवणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कामठेवाड यांचे नेतृत्वाखाली नायब तहसीलदार श्रीमती सविता माडजे, सपोनि सुधीर सूर्यवंशी पोलीस अंमलदार सूर्यवंशी ,नामदेव पाटील ,खुर्रम काझी ,सदानंद योगी ,बालाजी जाधव तसेच देवणी पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार कांबळे ,बुजारे, बनाळे व दोन शासकीय पंचासह विळेगाव तालुका देवनी या ठिकाणी सत्यवान रघुनाथ देवशेटवार यांचे शेतात छापा मारला या गुन्ह्याचा पुढील तपास देवणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कामठेवाड हे करत आहेत