उस्मानाबाद नागरी प्राथमिक आरोग्य अधिकारी Dr. शकील अहमद खान यांची ऑल इंडिया युनानी मेडिकल काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र खाकी ( उस्मानाबाद ) – ऑल इंडिया युनानी मेडिकल काँग्रेस, नवी दिल्ली या संस्थेचे Dr. शकील अहमद खान हे महाराष्ट्रातील सक्रिय पदाधिकारी आहेत. यापूर्वी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय अधिकारी विंगचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ऑल इंडिया युनानी मेडिकल काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी उस्मानाबाद नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र -1 वैराग रोड उस्मानाबाद येथील वैद्यकीय अधिकारी Dr. शकील अहमद खान यांची निवड झाल्या बद्दल उस्मानाबाद जिल्हा आरोग्य अधिकारी Dr.वडगावे यांच्या हस्ते Dr.शकील अहमद खान यांचा
भव्य सत्कार करण्यात आला . संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे राष्ट्रीय सरचिटणीस Dr. सय्यद अहमद खान यांच्या मार्गदर्शनानुसार संघटनेचे राष्ट्रीय संयोजक तथा प्रशासक Dr. S. M. हुसेन यांनी ही निवड केल्याचे जाहीर केले आहे. सर्वच स्तरातून Dr. शकील अहमद खानयांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जाहिरात
Powered by the Tomorrow.io Weather API
Recent Posts
17:30