पोलीस

सोलापूर तालुका पोलिसांनी 1 लाख 93 हजार रु. किमतीचा मुददेमाल चोरनाऱ्या आरोपीस 12 तासाच्या आत पकडले

महाराष्ट्र खाकी (सोलापूर) – सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून तक्रारदार महिला ह्या रिक्षा मधुन कोंडी ते MIDC पाकणी असा प्रवास करत असताना अज्ञात महिलेने त्यांच्या पर्स मधुन 1,60,000/- किमतीचे चे दागीने तसेच 42,5500/- रोख रक्‍कम यातील अनोळखी चोरट्या महिलेने चोरून नेले म्हणुन या फिर्यादी वरून सोलापूर तालुका पोलीस स्टेशन FIR NO.411/2021 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारकर शिंदे, SDPO सोलापूर विभाग सोलापूर व पोलीस निरीक्षक फुगे यांनी आनोळखी आरोपीचा शोध घेण्याकरीता सोलापूर तालुका पोलीस स्टेशन कडील अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आले होते. आरोपींचे गुन्हे करण्याच्या पद्धतीवरून संशयित आरोपी मिळुन हि मुळेगाव शिवारामध्ये आल्याने तीच्याकडुन गुन्हयात चोरलेला मुददेमांपैकी सर्व दागीने (1,60,000/- रु) तसेच 33,000/- रोख रक्‍कम हस्तगत करण्यात आले आहे. गुन्हयाचा अधिक तपास सपोफौ बाळु राठोड हे करत आहेत.

हि कामगिरी पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण तेजस्वी सातपुते मॅडम, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग
सोलापूर प्रभाकर शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली अरूण फुगे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका पोलीस स्टेशन , सह पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर, सह पोलीस निरीक्षक माधुरी तावरे मॅडम , सपोफो बाळु राठोड, सपोफौ सांजेकर सांपोहेकॉ/ शशि शिंदे, पोहेकॉ/फयाज बागवान, पोहेकॉ सुनिल बनसोडे, पोना. श्रीराम आदलींग,
मपोहेकॉ वैशाली कुंभार, मपोना/सरस्वती लोकरे, मपोना/ सुनित चवरे, पोकॉ. असिफ शेख, पोकॉ देवा सोलंकर, पो.को. किशोर सलगर, पो.को अशोक खवतोडे, पो.कॉ. राजु इंगेळ, यांनी केली आहे.

Most Popular

To Top