लातूर जिल्हा

लातूर शहरातील छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकाचे काम 26 जूनच्या आत पूर्ण करा – भाई ॲड. उदय गवारे

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर महानगरपालिकेचा कारभार महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी संभाळल्यापासून लातूर शहराचा सर्वांगीण विकास गतिमान झाला आहे. हे सर्वश्रुत आहे. पण एक गोष्ट मात्र खूप मंद गतीने होत असताना दिसत आहे ते म्हणजे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे काम, मंद गतीने का सुरु आहे याचे कारण अस्पस्ट आहे. ते लवकरात लवकर व्हावे म्हणून लोकराजा छत्रपती शाहू महाराज स्मारक समिती लातूरच्या वतीने भाई ॲड. उदय गवारे यांनी लातूरच्या जनतेला अभिवादन करण्यासाठी लातूर शहर महानगर पालिकेने 26 जूनच्या आत स्मारकाचा लोकार्पण सोहळा साजरा करावा अशी आग्रही मागणी मा.पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख,महापौर विक्रांत गोजमगुंडे,उपमहापौर चंद्रकांत बिराजदार,आयुक्त मित्तल यांच्याकडे केली आहे.येत्या 26 जूनला समतेचे महान पुजारी,विषमतेचे कर्दनकाळ, आरक्षणाचे जनक, मुला मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणारे लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती 26जून रोजी आहे.
मा. यशवंत चव्हाण व तत्कालीन मुख्यमंत्री ना.शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत लातूर शहरात प्रथमतः छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा लातूर नगर परिषदेने अर्धाकृती पुतळा बसवलेला होता.त्यानंतर जनतेच्या मागणीवरून पूर्णाकृती पुतळा बसवण्याचा निर्णय नगर पालिका प्रशासनाने घेतला व त्याची अंमलबजावणी लातूर शहर महानगर पालिकेने करण्यास सुरुवात केली.दोन वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकाचे काम सुरू करण्यात आले.परंतु या कामात अक्षम्य दिरंगाई करण्यात आली.विक्रांत गोजमगुंडे यांनी महापौर पदाची सूत्रे हातात घेताच चाबुतर्याच्या कामाला गती दिली.परंतु आजघडीला महाराजांचा पुतळा बसविण्यात आला नाही.लातूर मनपा प्रशासन लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी दिरंगाई केली आहे.अनेकवेळा लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करावे,पूर्णाकृती पुतळा लवकरात लवकर बसविण्यात यावा अशी मागणी कृती समिती आणि विविध संघटनांनी केली आहे.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

">
To Top