पोलीस असल्याचं सांगून स्वतःच्या वर्गमैत्रिणीला आणि लोकांना लुटल

महाराष्ट्र खाकी ( मुंबई ) – वसईच्या माणिकपूर पोलिसांनी गजाआड केलं आहे. प्रत्यक्षात पालिकेचा ठेकेदार असलेला हा व्यक्ती लोकांना पोलीस असल्याचं सांगून त्यांची फसवणूक करत होता. काही लोकांना त्यानं लुटलंही होतं. विशेष म्हणजे स्वतःच्या वर्गमैत्रिणीला त्यानं पोलीस असल्याचं सांगून लुटलं. त्यांनंतर पीडितेनं तक्रार केल्यानं माणिकपूर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली. पोरस विराफ जोखी असं या भागट्याचं नाव आहे. पोरसहा महानगर पालिकेचा कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यानं महानगर पालिकेमध्ये कामाचं एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याचं सर्वांना सांगितलं. त्यानंतर त्यानं त्याच्या ओळिखीच्या अनेकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडलं. गुंतवणूक केल्यास रक्‍कम दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवत त्यानं अनेकांना गुंतकणूक करायला लावली. गुंतवणूक करणाऱ्यांनी काही दिवसांनी पैसे मागितले तेव्हा पोरस यानं सर्वांना धमक्या द्यायला सुरुवात केली. त्याने फसवलेल्या लोकांना पोलिस असल्याचं सांगून शांत राहण्याची धमकी दिली. हा प्रकार अनेक दिवस चालला. पण पोरस काही केल्या पैसे देत नव्हता त्यामुळं अखेर पैसे गुंतवलेल्या काही जणांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा न्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरोपीनं त्याचं खोटं ओळखपत्रदेखिल तयार केलं होते. ते दाखवून तो अनेक लोकांना धमक्या देण्याचं, फसवण्याचं किंवा ठगण्याचं काम करत होता.आरोपी पोरसनं त्याचे फोटो दाखवून स्थानिक आमदार आणि उद्योगपती रतन टाटा यांच्यासोबत घनिष्ठ संबंध असल्याच्या वावड्या उठवल्या होत्या. आपलं कोणीही काहीही वाकडं करू शकणार नाही, असं म्हणत तो लोकांना फसवत होता. पण पीडितेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या भामट्याने आणखी किती जणांची फसवणूक केली याचा तपास पोलीस करत आहेत.

Powered by the Tomorrow.io Weather API
Recent Posts
02:05