एव्हरेस्ट शिखर सर करणारे पोलीस उपनिरीक्षक संभाजी गुरव यांचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले अभिनंदन आणि कौतुक

महाराष्ट्र खाकी (मुंबई) – महाराष्ट्र पोलिसांनी आपला ठसा आपल्या कामातून दाखवत असते. खेळ, बॉडीबिल्डिंग, फोटोग्राफी, लिखाण आणि कर्तव्याचे काटेकोर पालन आणि समाजाला गुन्हेगार मुक्त ठेवतात सोबतच आपली आवडहि जपतात अशाच एका महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्याने एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. याबद्दल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पोलीस अधिकारी संभाजी गुरव यांचे कौतुक केले आहे.सांगलीचे सुपुत्र संभाजी गुरव यांनी 23 मे रोजी एव्हरेस्ट शिखर सर केले. एक धाडसी अधिकारी म्हणून पोलीस खात्यामध्ये त्यांची ओळख आहे.जगातील सर्वोच्च पर्वत शिखर माउण्ट एव्हरेस्टला गवसणी घालणारे पोलीस उपनिरीक्षक संभाजी गुरव यांचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे. ही उत्तुंग कामगिरी करणारे महाराष्ट्र पोलिस बलातील पहिले मराठी अधिकारी ठरल्याबद्दल गुरव यांचा सार्थ अभिमान असल्याचे गृहमंत्री म्हणाले. पोलीस उपनिरीक्षक संभाजी गुरव यांनी यशाची अशीच शिखरे पादाक्रांत करावीत, अशा शुभेच्छा गृहमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Recent Posts