पोलीस

Solapur police सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि सोलापूर ग्रामीण पोलीस यांचा पोलीस व कुटुंबीयां साठी टेली फोनिक समुपदेशनाचा नवा उपकृम

महाराष्ट्र खाकी (सोलापूर) – कोरोना मुळे सर्वात जास्त जिम्मेदारी पडली असेल तर ती डॉक्टर आणि पोलीस यांच्यावर आहे. पोलीस रस्त्यावर उभे राहून जनतेसाठी स्वतःचे आणि कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात घालतात. म्हणून सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि स्पाईस ऑण्ड आईस इव्हेंट मोनेजमेन्ट यांच्या संकल्पनेतून पोलीस कोविड 19 च्या संसर्गाच्या कठिण परिस्थितीमध्ये मागील वर्ष दिड वर्षभरा पासुन पोलीसांवर पर्यायाने त्यांच्या कुटुंबीयांवर आलेला प्रचंड ताण पाहता मा. तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी टेली फोनिक समुपदेशनाचा नवा उपक॒म आज दि. 22/05/2021रोजी स्पाईस ऑण्ड आईस इव्हेंट मोनेजमेन्ट यांच्या सयुंक्त विद्यमाने सुरु केला आहे. या उपक॒मामध्ये सोलापूर ग्रामीण पोलीसांमार्फत स्पाईस ऑण्ड आईस इव्हेंट मॉनेजमेन्टचे प्रमुख, अनिश सहस्त्रबुध्दे व त्यांची प्रशिक्षीत टिम तयार करण्यात आलेली आहे. त्यांना मोबाईल, लॉपटॉप तसेच सोलापूर ग्रमीण पोलीस दलातील कोरोना पॉझीटीव्ह, कोरोनातुन नुकतेच बरे झालेले पोलीस व कुटुंबीय यांची माहिती एकत्रीत करुन पुरविण्यात आलेली आहे. ज्या पोलीसांनी अद्यापपर्यंत आजारी असल्याने, गरोदर असल्याने, कोरोना पॉझीटीव्ह असल्याने, स्तनदा माता असल्याने इत्यादी कारणांन्वये कोरोनावरील लस घेतली नाही, त्यांची सुध्दा माहिती पुरविण्यात आलेली आहे. या समुपदेशन सेंटर मधील टिम वरिल सर्व पोलीस अंमलदारांना मोबाईल दारे संपर्क करुन त्यांचे मोनाधैर्य वाढविण्यासाठी समुपदेशन केले जाईल. तसेच ज्यांनी वरिल कारणास्तव आद्याप लस घेतली नाही


त्यांना लस कधी घ्यायची याबाबत देखील समुपदेशन केले जाणार आहे. जे पोलीस कोरोना पॉझीटीव्ह असुन
सध्या हॉसपिटल मध्ये उपचार घेत आहेत त्यांना वेळोवेळी फोनव्दारे संपर्क करुन त्यांना मानसीक आधार
देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. उपचार घेत असलेल्या पोलीसांशी व्हिडीओ कॉलदाारे सुध्दा संपर्क साधुन
काउंसलींग सेंटर मार्फत त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी जाणुन घेवून त्या सोलापूर ग्रामीण पोलीस
दलातर्फे सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपकामाची औपचारीक सुरुवात आज दि. 22/05/2021 रोजी सकाळी 10 वाजता स्पाईस ऑण्ड आईस इव्हेंट मॉनेजमेन्टच्या कार्यालयात करण्यात आली. या वेळी मा. तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी या टिमला या उपकामाचा उद्देश सांगुन मोलाचे मार्गदर्शन केले. सदर
कार्यकमास स्पाईस ऑण्ड आईस इव्हेंट मॉनेजमेन्टचे प्रमुख अनिश सहस्त्रबुध्दे, स.पो.नि. विकांत बोधे,
पो.उप.नि. सुरज निंबाळकर, पो.ना. अभिजीत पेठे हे उपस्थित होते.तेजस्वी सातपुते या पोलिसांसाठी आणि लोकांसाठी असे वेगवेगळे उपक्रम सतत राबवत असतात.

Most Popular

To Top