लातूरच्या भुंकपात जसे शरद पवारांनी तळ ठोकून काम केले तसे उद्धव ठाकरेंनी कोकणात करावे

महाराष्ट्र खाकी (पुणे ) – भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सारखेच काही ना काही सरकारला बोलत असतात. काही दिवसा पूर्वी त्यानी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती,ती चर्चा शांत होत नाही तोपर्यंत चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक सल्ला दिला आहे ! मुंबई आणि कोकणात तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाहणी दौरा केला . या पाहणी दौऱ्यावरून विरोधी पक्ष भाजप नेते टीका करत आहेत. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री असताना लातूरच्या भूकंपामध्ये त्यांनी केलेल्या कामाच्या उदाहरणाची आठवण करून देत एक सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले दोन दिवसांत पंचनामे करून मदत जाहीर करू. पण दोन दिवसांत पंचनामे होण्यासाठी त्यांनी तीन दिवस तिकडे जायला हवं होतं. उद्धवजींशी माझं काही वाकड नाही.ते काही माझे वैरी नाहीत पण प्रशासन हे काठी घेऊन बसल्याशिवाय ताळ्यावर येत नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. शरद पवार राजकीयदृष्ट्या आमचे कितीही विरोधक असले तरीपण लातूरच्या भूकंपामध्ये शरद पवार लातूरमध्ये तंबू ठोकून राहिले. त्यामुळे तिथली परिस्थिती नियंत्रणात आली. एवढ्या मोठ्या संकटात 8 दिवस राहणं कठीण आहे. आता वादळ आल्यानंतर तिथली हवा बरी आहे. तुम्हाला प्रकृतीच्या समस्या आहेत तर तंबूत नका राहू पण प्रशासनात भिती निर्माण व्हायला हवी, बघा मुख्यमंत्री बसले आहेत, अशी आठवण पाटील यांनी करून दिली. दरम्यान, महाराष्ट्रात संजय राऊतांनंतर अजित पवार आहेत. की त्यांना सगळ्या विषयांवर मत आहेत. सगळ्या विषयांवर मार्गदर्शन करायचं असून सगळ्या विषयांवर विचारणा करण्याचा त्यांना अधिकार असल्याच चंद्रकांत पाटील म्हणाले.

Recent Posts