लातूर जिल्हा

लातूर LCB चे अमलदार अंगद कोतवाड यांनी त्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस दिले

महाराष्ट्र खाकी (लातूर ) – कोरोनाच्या या कठीण काळात पोलीस आणि आरोग्य प्रशासनावर खूप मोठी जिम्मेदारी आहे. पोलीस बांधव जीवाची बाजिलाऊन अहोरात्र मेहनत घेत रस्त्यावर आहेत. पोलीस तन आणि मन लावून आपले कर्तव्य पार पाडत आहेत पण लातूर (LCB) स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अमलदार अंगद कोतवाड यांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांचे 01 महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहे. यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे आणि विशेष LCB


पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे ,पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी पोलीस अंगद कोतवाड यांचे कौतुक केले.अंगद कोतवाड यांनी अगोदरहि असेच एक महिन्याचे वेतन समाज उपयोगासाठी दिले होते.कोरोनाच्या महामारीत सरकारला लोकांसाठी आरोग्य व्यवस्था पूर्ण करण्यासाठी या निधीचा उपयोग होणार आहे. अंगद कोतवाड यांच्या निर्णयामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल आणि पोलीस आता तन, मन आणि धन लावून लोकांसाठी आपले कर्तव्य पार पाडत आहेत असे दिसून येत आहे.

Most Popular

To Top