Kolhapur news,महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

महाराष्ट्र खाकी ( कोल्हापूर ) – महाराष्ट्र राज्याच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्यात आला.
या ध्वजारोहण समारंभाला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कांदबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ.दत्तात्रय कवितके, उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, प्रातांधिकारी वैभव नावडकर, तहसिलदार अर्चना कापसे उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय काटेकोरपणे सामाजिक अंतरचे पालन करत आणि साधेपणाने करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात हा ध्वजारोहण कार्यक्रम साधेपणाने साजरा झाला.

Recent Posts