महाराष्ट्र खाकी (उस्मानाबाद) – राज्यात सध्या कोरोनाचा संसर्घ जास्त प्रमाणात वाढला आहे. म्हणून सरकारने संचार बंदी, समूह बंदी लागू केली आहे. सोबत शाळा, कॉलेज, जिम, योगा, डान्स क्लासेस ई सर्व बंद केले आहेत. सर्व काही ऑनलाईन चालू आहे क्लास, शिक्षण पण सध्या ऑनलाईन चालू आहे. पण एक क्लास मात्र आजही चालू आहे असे दिसून येत आहे तो म्हणजे उस्मानाबाद आरोग्य विभागाकडून समुदाईक आरोग्य अधिकारी (CHO)भरती झालेले नवीन प्रशिक्षनार्थी , यांची सध्या सहा महिन्याचे ट्रेनिंग चालू आहे. या ट्रेनिंग मध्ये या प्रशिक्षनार्थीचें OPD ट्रेनिंग असते आणि दिवसातून एक लेक्चर असते. पण या लेक्चर मध्ये सर्व प्रशिक्षनार्थी यांची बसण्याची व्यवस्था हि सोशल डिस्टंसिंगचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत असे दिसून येत आहे! या निवड झालेल्या प्रशिक्षनार्थी मध्ये बऱ्याच जणांना कोरोनाची लागण झाली आणि ते बरेही झाले.पण या कोरोना झालेल्या प्रशिक्षनार्थीचें क्लास (लेक्चर) तर बुडाले. मग जर हेच क्लास ऑनलाईन झालेतर असा प्रॉब्लेम येणारच नाही आणि क्लास पण होईल अशी चर्चा आहे.आणि कोरोनाचा प्रसार हि थांबेल. यात काही महिला प्रशिक्षनार्थी आहेत ज्यात काहीजण लहान मुलांच्या आई आहेत. काहीजण तर प्रेग्नेंट आहेत. या क्लास (लेक्चर) साठी यांना कसल्याही परिस्थितीत यावेच लागते. मान्य आहे हे उद्या चालून समुदाईक आरोग्य अधिकारी (CHO) आहेत. पण त्यांच्या मागे बरेच जण असतात घरी वयस्कर, लहान मूल असतात या क्लासमुळे यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे असे दिसून येते . या क्लास (लेक्चर) ला ऑनलाईन केले तर बऱ्याच प्रमाणात कोरोनाचा प्रसार होणार नाही. हि बाब उस्मानाबाद जिल्हा आरोग्य विभागाच्या लक्ष्यात आली असावी. उस्मानाबाद जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डि. के. पाटील यात काहीतरी बदल करतील का ?
उस्मानाबाद आरोग्य विभागाच्या CHO ट्रेनिंग क्लास मध्ये सोशल डिस्टंसिंग चा फाज्जा ! ऑनलाईन क्लास होऊ शकतात!
- Maharashtra Khaki
- April 30, 2021
- 7:28 am
Recent Posts
खाकी फाऊंडेशनचा निलंगा मतदारसंघात आ. संभाजी पाटील निलंगेकर यांना पाठिंबा
November 12, 2024
No Comments