लातूर जिल्हा

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न आणि जिल्हा पोलिस दलासाठी 51 दुचाकी व 28 चार चाकी वाहनांचे वितरण.

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर कोरोना मुळे राज्यात लॉकडाऊन आहे. कोरोनाचा वाढता संसर्घ लक्षात घेता या वर्षी हि 1मे म्हणजे महाराष्ट्र दिन साध्या पद्धतीने साजरा करण्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. त्याच अनुषंगाने लातूर मध्ये राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांच्या शुभ हस्तें सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापौर विक्रांत गोजमगुंडे, महानगर पालिका आयुक्त अमन मित्तल हे उपस्थित होते.

सोबतच जिल्हा वार्षिक योजना 2020-21 अंतर्गत लातूर जिल्हा पोलिस दलासाठी 51 दुचाकी व 28 चार चाकी वाहन वितरण कार्यक्रम पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अमित देशमुख यांनी 51 दुचाकी व 2 8चार चाकी वाहनास हिरवा झेंडा दाखवून हि सर्व वाहने लातूर पोलिसांच्या सुपूर्द केले.या 51 दुचाकी आणि 28 चार चाकी वाहनांमुळे लातूर पोलीस दलाची ताकत वाढणार आहे. लातूर जिल्हा गुन्हेगार मुक्त आणि शांत ठेवण्यास लातूर पोलीस दलास खूप मोठी मदत होणार आहे.

Most Popular

To Top