साई फाऊंडेशन द्वारा लातूर शहरातील वैश्या वस्तीत घरपोच 50 अन्नधान्याचे किट व सॅनिटरी पॅड चे वाटप.

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर शहरातील वैश्या वस्तीत घरपोच 50 अन्नधान्याचे किट व सॅनिटरी पॅड चे वाटप अँड.रुद्राली शैलेश पाटील चाकूरकर यांनी केले.
शहरामध्ये सर्वांत ज्यास्त उपेक्षित व दुर्लक्षित असलेल्या वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिला व त्यांच्या कुटुंबियांना सध्याच्या महाभयंकर करोना कालखंडात उपासमारीची वेळ आली होती. माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची नात अँड.रुद्राली शैलेश पाटील चाकूरकर यांनी साई फौंडेशन च्या माध्यमातून या सर्व कुटुंबियांना घरपोच अन्नधान्याचे किट व सॅनिटरी पॅड चे वाटप केले. या अन्नधान्याच्या किट मध्ये 10 किलो तांदूळ,05 किलो आटा, एक लिटर तेल, एक किलो मीठ, अर्धा किलो साखर, तीन किलो दाळ व 200 ग्राम प्रत्यकी मिरचू व हळदी चे आहे.

याप्रसंगी अँड.रुद्राली शैलेश पाटील चाकूरकर यांनी लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात कोठेही गरजू कुटुंबास अन्नधान्याचे किट सह इतरही मदतीची आवश्यकता असल्यास साई फौंडेशन द्वारे ती केली जाईल असे सांगितले.अँड.रुद्राली शैलेश पाटील चाकूरकर आणि ऋषीका शैलेश पाटील चाकूरकर या दिल्ली नोएडा येथे साई फाऊंडेशन च्या माध्यमातून महिला आणि गरिबांची सेवा आणि मदत मोठ्या प्रमाणात करत असतात. त्याचे कार्य उल्लेखनीय आहे.

या कार्याच्या यशस्वीतेसाठी प्रा.ओमप्रकाश झुरुळे, सचिन साळुंके,अँड.सचिन हुरदळे, गिरीश ब्याळे, चंद्रशेखर वडजे, रुशीका पाटील चाकूरकर, एपीआय दिपाली गित्ते,डॉ.दाडगे,मैत्री गायकवाड, शुभम पाटील,राम व्यवहारे, ऋषिकेश पाटील,मारुती चिकटे,संगमेश्वर स्वामी, शुभम दुधाळे,समीर पठाण,गंगापुरे आदींनी परिश्रम घेतले.

Recent Posts