अमित देशमुखांनी पालकमंत्री पदाचा चार्ज लक्ष्मीकांत कर्वा यांच्याकडे द्यावा – मनीष बंडेवार

महाराष्ट्र खाकी (लातूर) – काही दिवसापूर्वी लातूर मधील सर्व हॉस्पिटलला लागणारे ऑक्सिजन जवळपास संपले होते. काही वेळ जाईल इतकेच ऑक्सिजन शिल्लक होते सरकारी हॉस्पिटल असो वा विवेकानंद हॉस्पिटल यामधील ऑक्सिजन साठी विवेकानंद हॉस्पिटलचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्वा यांनी या गंभीर परिस्थितीचा आढावा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांना सांगितला आणि अमित देशमुख यांनी काही वेळात ऑक्सिजन टँकर लातूरसाठी पाठवून दिला. ही सर्वपरिस्थिती कर्वा यांनी आपल्या फेसबुक वर लिहून पालकमंत्री अमित देशमुख यांचे कौतुक आणि आभार मानले. आणि हे अमित देशमुखांनी शेअर केले. आणि लोकांनी कर्वा यांचे आभार मानले आणि कौतुकही केले. पण मनीष बंडेवा र यांनी व्हिडीओच्या माध्यमातून या सर्व प्रकाराला “करोनाच्या वाईट परिस्थितीत लक्ष्मिकांत कर्वा यांचा श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न. रूग्नांची परिस्थिती वाईट आसताना स्व:चा मोठेपणा दाखवणारा असंवेदनशीतेचा कहर करणारा लक्ष्या….” या शब्दात आपले मत मांडले आहे. मनीष बंडेवार यांनी व्हिडिओत काय म्हणाले आहेत ते पाहू

मनीष बंडेवार यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. पालकमंत्री यांनी आपला चार्ज कर्वा यांना द्यावा. पण बंडेवार च्या बोलण्यातून लक्ष्मीकांत कर्वा यांच्याबद्दल वेक्ती द्वेष दिसून येत आहे अस वाटतय. कारण मागे एक वर्षांपूर्वी कर्वा यांनी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सोबतचे फोटो शेअर केले होते तेव्हा देखील कर्वा यांच्याबद्द काही जणांचा द्वेष दिसून आला होता.

लक्ष्मीकांत कर्वा हे एका हॉस्पिटल चे उपाध्यक्ष म्हणून पालकमंत्री यांच्याशी ऑक्सिजन प्रश्नाबद्दल बोलले होते. हे बहुतेक मनीष बंडेवार विसरले दिसत आहेत की काय अस दिसून येत आहे. मनीष बंडेवार यांनी याच तत्परतेने आणि जिम्मेदारीने असाच एक व्हिडीओ लातूरचे खासदार यांच्याकार्यपद्धतीवर ही बनवला पाहिजे होता म्हणजे त्यांच्यावर वेक्ती द्वेष असा आरोप लागला नसता ! कर्वा यांना ज्यांनी मदत मागितली त्यांना होता होईल तितकी मदत लक्ष्मीकांत कर्वा यांनी केली आहे असे बरेच लोक म्हणत आहेत.

Powered by the Tomorrow.io Weather API
Recent Posts
19:50