देश

लातूरचे माजी खासदार डॉ सुनील गायकवाड यांना राष्ट्रीय समाज सेवा रत्न पुरस्कार जाहीर.

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर चे माजी लोकप्रिय खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना सन 2021 चा ” राष्ट्रीय समाज सेवा रत्न पुरस्कार” जाहीर झाला आहे. मध्यप्रदेश भोपाळ येथील द ग्लोबल ह्युमन राईट्स फाउंडेशन आणि नॅशनल अंटी हराशमेंट फाउंडेशन यांच्या वतीने ग्लोबल स्तरावरील 2021 चा हा पुरस्कार डॉ गायकवाड यांना जाहीर झाल्याचे पत्र नुकतेच मिळाले आहे. संस्थेचे अध्यक्ष रवी के एस नारायण आणि एन ए एच चे डायरेक्टर जनरल विकास महाजन यांनी पत्रा द्वारे कळवले आहे.समाजा साठी विशेष काम करणाऱ्या आणि लोकोपयोगी योजना राबवण्यात प्रतेक्ष सहभाग असणाऱ्या देशातील मान्यवर यांना हा पुरस्कार दिला जातो. डॉ गायकवाड हे खासदार आसतना अनेक योजना लातूर लोकसभा मतदार संघात राबवल्या त्याबद्दल हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे.


यावर्षी चा “राष्ट्रीय समाज सेवा रत्न-2021” चा पुरस्कार वितरण सोहळा हा कार्यक्रम कोवीड-19 च्या वाढत्या प्रदुर्गमुळे पुरस्काराचा मोमेंटो प्रमाणपत्र हे 10 मे 2021 रोजीच पुरस्कार मिळालेल्याना कुरीअर द्वारे दिला जाणार असल्याचे ही कळवण्यात आले आहे. प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना नुकताच डॉ बी आर आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड ही 8 मे ला नेपाळ लुंबिणी ला मिळणार आहे.हा यावर्षीचा याच आठवड्यात जाहीर झालेला दुसरा ग्लोबल अवॉर्ड आहे.त्याबद्दल डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

">
To Top