पोलीस

लातूर पोलीस आणि मनपा संयुक्त कारवाईत 15 दिवसात 6 लाख 39 हजार 100 रुपयांचा दंड वसुल

महाराष्ट्र खाकी (लातूर) – महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता राज्य सरकारने कडक नियमासह लॉकडाऊन लागू केला आहे. तरीही नागरिक नियमाचे बिनधास्त उल्लंघन करत आहेत.अशीच परिस्थिती लातूर जिल्ह्यात दिसून येत आहे म्हणून लातूर जिल्ह्यात कोवीड -19 चा प्रसार रोखण्यासाठी कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे, कडक संचारबंदी असली तरी लातूरचे नागरिक कोरोना नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापनांवर 1एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत लातूर पोलीस व महानगपालीकेकडून आत्तापर्यंत 6 लाख 39 हजार 100 रुपयांचा दंड आकारण्यात आलेला आहे.महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊन नियमांचे पालन करून कोरोनाच्या या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना सरकार तसेच स्थानिक प्रशासन करत आहे. नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन लातूर जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Most Popular

To Top