महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर शहरातील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लोकांना कोणाच्या चाचण्या करण्याचे आवाहन केले आहे आणि शहरात वेवगळ्या ठिकाणी कोरोना चाचण्या करण्यासाठी केंद्र स्थापना केले आहेत जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही. कोरोनामुक्त लातूर अभियानात सहभागी व्हा. लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने चाचणी केंद्र येथे कोरोना चाचणी पूर्णपणे मोफत केली जात आहेत. शहरातील सर्व नागरिकांनी विशेषतः व्यापारी बांधव व त्यांच्याकडील कामगार यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी
82 लाख रुपयांचा खर्च करून शहरात CCTV कॉमेरे बसणार.
शहरातील नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या वतीने प्रमुख रस्ते व चौकांमध्ये CCTV कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.यासाठी 82 लाख रुपयांचा खर्च येणार असून जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मान्यता दिली असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.
लातूर शहराचा वेगाने विकास होत आहे.चारही दिशांनी विस्तारित होणाऱ्या शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला महानगरपालिकेकडून प्राधान्य दिले जात आहे.त्या अनुषंगाने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ८२ लाख ९५ हजार ८८९ रुपये खर्च प्रस्तावित आहे. महानगर पालिकेची आर्थिक स्थिती बेताची असल्याने नागरी दलितेत्तर योजनेतून हे काम प्रस्तावित करण्यात आले होते. नुकतीच याच्या प्रशासकीय मंजुरीचे आदेश जिल्हाधिकारी प्रथविराज बी पी यांनी निर्गमित केले आहेत.