लातूर जिल्हा

लातूर,वन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे ही केळगाव आगीची दुर्घटना घडली!

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्ह्यात वन क्षेत्र खूप कमी असलेला जिल्हा आहे जितके वन क्षेत्र जिल्ह्याला लाभले आहे त्याला सांभाळ करण्यासाठी आणि वसढवण्यासाठी वन परिक्षेत्र कार्यालय आहे. पण या कार्यालयातील अधिकारी आपल्या कर्तव्य पूर्णपणे परपडत नसल्याचे दिसून येत आहे.लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील केळगाव येथे 53 हेक्‍टर क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात आहे. त्यातील सर्वे नंबर 99 क या वन विभागाच्या क्षेत्रात सन 2019-20 या वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली होती. पण अचानक लागलेल्या आगीमध्ये अनेक झाडे आगीत जळून खाक झालीbआहेत . वन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे ही मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये शासनाचे लाखो रुपये खर्च करून 2 कोटी वृक्ष लागवडी या कार्यक्रमाच्या अंतर्गत वृक्षलागवड करण्यात आली होती. अचानक लागलेल्या आगीमध्ये त्यातली हजारो झाडे हे जागीच जळून त्या राख झाली आहे.आग विझवण्याचे केविलवाणे प्रयत्न हे वन विभागाकडून सुरू होते, मात्र आग आटोक्यात आली नव्हती.एकंदरीत पाहता आगीत हजारो झाडे,झुडुपे जळून गेल्याने शासनाचा लाखो रुपयांचा फटका बसला आहे. आगीच्या लोळाने हरीण,मोर, रानडुक्कर असे वन्य प्राणी हे वन सोडून जीव वाचवण्यासाठी जंगलातून पळ काढून निघून गेल्याचे स्थानिक सांगत आहेत.

Most Popular

To Top