Home » प्रशासकीय » Latur DCC bank आमदार अभिमन्यू पवारांनी न बोलता करून दाखवले, लातूरच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात आमदार पवारांचा पॉवर गेम, पत्नीला आणले बिनविरोध निवडून

Latur DCC bank आमदार अभिमन्यू पवारांनी न बोलता करून दाखवले, लातूरच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात आमदार पवारांचा पॉवर गेम, पत्नीला आणले बिनविरोध निवडून

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बहुचर्चित निवडणुकीत आमदार अभिमन्यू पवार यांच्या धर्मपत्नी शोभाताई पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. याआधी बँकेचे माजी चेअरमन व माजी आमदार धीरज देशमुख यांची बिनविरोध निवड झाली होती. आता शोभाताई पवार यांच्या बिनविरोध निवडीमुळे लातूरच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार अभिमन्यू पवार यांचा प्रभाव आणि राजकीय पकड पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

​जिल्ह्याच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात देशमुखांनंतर आता ‘पवार कुटुंब’ जनतेच्या समस्या सोडवणारे एक आश्वासक आणि हक्काचे केंद्र म्हणून समोर येत आहे. जिल्हा बँकेची निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जात असताना, सहकारी क्षेत्रातील दिग्गज नेत्यांना जे साध्य करता आले नाही, ते आमदार पवार यांनी करून दाखवले. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (भाऊ अविनाश पाटील यांच्यासाठी), माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर (भाऊ अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासाठी) आणि आमदार रमेश कराड (मुलासाठी) यांना बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर करता आला नाही; मात्र आमदार अभिमन्यू पवार यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात कोणतीही जाहीर वक्तव्ये न करता किंवा कोणताही गवगवा न करता आपल्या पत्नीची बिनविरोध निवड घडवून आणली.

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी ज्या संयमी आणि कार्यक्षम पद्धतीने लातूरच्या सहकार क्षेत्राला दिशा दिली, त्याच पावलावर पाऊल ठेवून आमदार अभिमन्यू पवार काम करत असल्याचे दिसून येत आहे. बंद पडलेला किल्लारी साखर कारखाना पुन्हा सुरू करून तो यशस्वीपणे चालवणे आणि विक्रमी साखर उत्पादन घेणे, हे त्यांच्या सहकार क्षेत्रातील दूरदृष्टीचेच उदाहरण आहे. अनेक नेत्यांनी सहकारी कारखाने खासगी तत्त्वावर चालवायला दिले किंवा विक्री केले; परंतु आमदार पवार यांनी सहकाराचे महत्त्व जपत जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. संयम, निशब्द कार्यपद्धती आणि ठोस कामगिरीच्या जोरावर अभिमन्यू पवार यांनी सहकार क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Share This News

Related Post

National

DIG NANDED NEWS ​लातूर स्थानिक पोलिसांच्या हलगर्जीपणावर DIG शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाचा सर्जिकल स्ट्राईक, लातुरात वाळू, मटका व जुगार अड्ड्यांवर धाड; १८ जण जाळ्यात, ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त