Home » पोलीस » Latur traffic news ब्रिज हॉटेलने लातूर पोलिसांच्या आदेशांना केराची टोपली दाखवली; हॉटेलची पार्किंग नावालाच , छत्रपती शिवाजी महाराज चौकात ट्राफिकचे कारण ब्रिज हॉटेलच, वाहतूक विभाग काय करतो ?

Latur traffic news ब्रिज हॉटेलने लातूर पोलिसांच्या आदेशांना केराची टोपली दाखवली; हॉटेलची पार्किंग नावालाच , छत्रपती शिवाजी महाराज चौकात ट्राफिकचे कारण ब्रिज हॉटेलच, वाहतूक विभाग काय करतो ?

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे एपीआय मनोज जिरगे यांनी रस्ते, चौक आणि वाहतूक व्यवस्थेत बरेच बदल केले. परिणाम? शहरातील बरीच कोंडी कमी झाली. पण काही आस्थापनांना हे काहीच समजत नाही. त्यांची मनमानी सुरूच आहे आणि त्यात अव्वल क्रमांक आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातलं ब्रिज हॉटेल.

या हॉटेलला स्वतःची पार्किंग आहे का? नावाला आहे. तीही अर्धी. अर्ध्या जागेत गोडाऊन भरलेला आहे. हॉटेल दोन, पार्किंग एक आणि तीही लहान. चारचाकी गाड्या वळायला जागा नाही. परिणाम? ग्राहक थेट रस्त्यावर गाड्या लावून हॉटेलमध्ये जातात. रस्ता अडला, वाहतूक बिघडली, कोंडी झाली. शिस्तीत सुरळीत चाललेली वाहतूक एकाच ठिकाणी अडकते.

काही दिवसांपूर्वी समजमाध्यमावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. गाड्या रस्त्यावर ठासून भरलेल्या, कोंडीची परिस्थिती. पण पोलीस प्रशासन? कसलीच कारवाई नाही. शहरात वाहन चालवण्याबाबत उपक्रम, जागरूकता, कारवाया सगळं चालू आहे. पण ब्रिज हॉटेलची ही खुली मनमानी दिसतच नाही का त्यांना? पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशांना ब्रिज हॉटेलकडून केराची टोपली दाखवली जात आहे, हे स्पष्ट आहे.

शहर वाहतूक विभाग आता काय करणार? ब्रिज हॉटेलवर कारवाई करणार की अर्थपूर्ण दुर्लक्ष करून “काही नाही झालं” असे नाटक करणार ? रस्त्यावर गाड्या लावून वाहतूक बिघडवणाऱ्या आस्थापनांना जर अशीच मोकळीक दिली तर बाकीच्या शिस्तीचा काय उपयोग ?

Share This News

Related Post

National