Home » महाराष्ट्र » कुलदीप सूर्यवंशींचा प्रशासनाला थेट इशारा – “अल्टिमेटमवर ॲक्शन घेतले, आता जरंगे पाटलांच्या मागण्यांवरही घ्या”

कुलदीप सूर्यवंशींचा प्रशासनाला थेट इशारा – “अल्टिमेटमवर ॲक्शन घेतले, आता जरंगे पाटलांच्या मागण्यांवरही घ्या”

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर मराठा आंदोलक कुलदीप सूर्यवंशी यांच्या प्रशासन आणि आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या गाड्या जाळू जशी या अल्टिमेटमवर लगेच ॲक्शन घेतली, तसेच मनोज दादा जरंगे पाटील यांच्या मागण्यांवरही तात्काळ निर्णय घ्या अशी मागणी कुलदीप सूर्यवंशी यांनी केली. मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरंगे पाटील यांच्या मागण्यांवर दिनांक ८ सप्टेंबर २०२६ पर्यंत निर्णय न झाल्यास प्रशासन आणि आजी-माजी-भावी खासदार-आमदारांच्या गाड्या लातूर जिल्ह्यातून जाळण्याची घोषणा मराठा आंदोलक कुलदीप सूर्यवंशी यांनी व्हिडिओद्वारे केली होती. ही सहा महिन्यांची अल्टिमेटम नोटीस होती आणि सरकारला थेट इशारा होता.

परंतु या घोषणेनंतर लातूर पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई केली. कुलदीप सूर्यवंशी यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १३० अन्वये कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. जरंगे पाटलांच्या उपोषणाकडे आणि मागण्यांकडे महिनोनमहिने दुर्लक्ष करणारे प्रशासन, अल्टिमेटम ऐकताच मात्र सक्रिय झाले!

यावर कुलदीप सूर्यवंशी यांनी आपले मत व्यक्त करताना प्रशासनाला थेट विचारले – “जशी या अल्टिमेटमवर लगेच ॲक्शन घेतली, तसेच मनोज दादा जरंगे पाटील यांच्या मागण्यांवरही तात्काळ निर्णय घ्या. ही नम्र विनंती आहे.” त्यांनी शेवटी स्पष्टपणे सांगितले – “लढेंगे जितेंगे… हम सब जरांगे!”

ही घटना प्रशासनाच्या दुटप्पी धोरणाचीच द्योतक आहे. आरक्षणाच्या लढ्यात उदासीन राहणारे आणि आंदोलकांना तात्काळ नोटिसा देणारे प्रशासन आता मराठा समाजाच्या संतापाची तीव्रता ओळखत आहे का? कुलदीप सूर्यवंशी यांच्या या स्पष्ट इशार्‍याने लातूरमधील मराठा आंदोलन आणखी आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Share This News

Related Post

National

Latur police रेणापूर ते निलंगा… चार ठाण्यांच्या हद्दीत जुगार-मटका खुलेआम चालत होते, तरीही संबंधित पोलीस निरीक्षकांना काहीच कळलं नाही? म्हणून DIG पथकाने जुगार-मटका अड्ड्यांवर छापे टाकत केली कारवाई