Latur police रेणापूर ते निलंगा… चार ठाण्यांच्या हद्दीत जुगार-मटका खुलेआम चालत होते, तरीही संबंधित पोलीस निरीक्षकांना काहीच कळलं नाही? म्हणून DIG पथकाने जुगार-मटका अड्ड्यांवर छापे टाकत केली कारवाई
महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने जुगार अड्डे आणि मटका बुकींवर एकामागून एक धडक कारवाया केल्या. रेणापूर, गांधी चौक, शिवाजीनगर आणि आता निलंगा पोलीस स्टेशन हद्दीतही छापे पडले. रोकड, मोबाईल, वाहने जप्त झाली, आरोपी ताब्यात घेतले. नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे…
