सत्ताधारी नगरसेवकांच्या मुजोरीमुळे प्रशासनाचे मनोबल खचले, यापूर्वीही महिला अधिकाऱ्यांना चप्पल दाखविणे, अंगावर धावून जाण्याचे प्रकार; माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचा संतप्त सवाल
महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर महानगरपालिकेत सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांच्या मुजोरीमुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांसोबत धक्काबुक्की आणि असभ्य वर्तणूक केल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. या मनमानी कारभाराविरोधात आणि वाढत्या असुरक्षिततेमुळे संतापलेल्या मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी **कामबंद आंदोलन** पुकारले असून, लातूरच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ…

