Home » प्रशासकीय » सुरेश पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय माहिती कार्यालयाच्या सहाय्यक संचालकपदाचा स्वीकारला पदभार

सुरेश पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय माहिती कार्यालयाच्या सहाय्यक संचालकपदाचा स्वीकारला पदभार

महाराष्ट्र खाकी ( छत्रपती संभाजीनगर / विवेक जगताप ) – छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय माहिती कार्यालयात सहाय्यक संचालक (वर्ग-२, राजपत्रित) या महत्त्वपूर्ण पदावर सुरेश पाटील हे अत्यंत उत्साहात रुजू झाले आहेत. उपसंचालक प्रवीण टाके यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आदरतिथ्य करत कार्यालयात त्यांचे स्वागत केले.

माजी सहाय्यक संचालक  गणेश फुंदे  यांची जिल्हा माहिती अधिकारी, पुणे येथे बदली झाल्यामुळे रिक्त झालेल्या या पदाचा पदभार सुरेश पाटील यांनी फुंदे यांच्याकडून अधिकृतपणे स्वीकारला. आता ते उपसंचालक प्रवीण टाके यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर विभागाची धुरा सांभाळणार आहेत.

सुरेश पाटीलयांच्या समृद्ध अनुभवाची शिदोरी
सहाय्यक संचालक पदाची धुरा हाती घेण्यापूर्वी सुरेश पाटील यांनी शिर्डी येथे माहिती अधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली आहे. या सेवाकाळात त्यांनी अत्यंत जबाबदारीने जळगाव आणि अहिल्यानगर येथील जिल्हा माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारही समर्थपणे सांभाळला आहे.
त्यांची शैक्षणिक व व्यावसायिक पार्श्वभूमी अतिशय समृद्ध असून, त्यांनी पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. या क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी  दैनिक सकाळ, पुढारी आणि सायं दैनिक लोकमान्य सांजवर्ता  या प्रतिष्ठित वृत्तपत्रांमध्ये पत्रकार म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

तसेच, प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग, नाशिक यांच्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी म्हणूनही त्यांनी आपली प्रशासकीय कौशल्ये सिद्ध केली आहेत. सुरेश पाटील यांच्या रुपाने एक अनुभवी, धडाडीचा आणि पत्रकारितेची पार्श्वभूमी असलेला अधिकारी विभागास लाभल्यामुळे शासकीय योजनांची व माहितीची जनजागृती आणखी प्रभावीपणे होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Share This News

Related Post

National