महाराष्ट्र खाकी (प्रतिनिधी – उमरगा) – धाराशिव आरोग्य विभागात निष्काळजीपणाचा नवा अध्याय!चाळीस हजार पगारासाठी ग्रामीण जनतेच्या जीवाशी खेळणारा CHO – वरिष्ठ अधिकारी डोळे मिटून बसले? आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांच्या कारभाराखालील आरोग्य विभागात अधिकारी आपली नोकरी फक्त पगारासाठी करतात, जनतेच्या आरोग्याशी खेळतात, हे उघड दिसत आहे. उमरगा तालुक्यातील त्रिकोळी उपकेंद्रातील CHO चा कारभार हा याच असुरी मानसिकतेचा नमुना आहे.
त्रिकोळी व परिसरातील चार गावांतील गरीब शेतकरी, मजूर, महिलांचे, वृद्ध आणि लहान मुलांचे आरोग्य या CHO च्या निष्काळजीपणामुळे थेट धोक्यात आले आहे.
CHO यांच्यावर आरोपांची यादी
1) उपकेंद्रात नावाला येतात, कामकाज मात्र शून्य
3) रोजच्या उपस्थितीचे बायोमेट्रिक किंवा रजिस्टरमध्ये काहीही नोंद नाही.
4) वेळेचे बंधन नाही, जबाबदारी नाही, उत्तरदायित्व नाही.
5) सामान्य ग्रामीण नागरिकांना शासकीय आरोग्य सुविधांपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवणे.
6) तक्रार केली तर वरिष्ठांवरच खोटे आरोप करणे आणि स्वतःचा निष्काळजी कारभार चालू ठेवणे.
एका शासकीय अधिकाऱ्याने “मला फक्त ४० हजार पगार हवा, काम नको” अशी मानसिकता ठेवली तर ग्रामीण भागातील गरीब माणसाचा जीव कशाला धोक्यात येणार नाही? हा प्रश्न आज त्रिकोळी परिसरातील प्रत्येक ग्रामस्थ विचारत आहे.
आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी काय करत आहेत?
एका CHO ला एवढा मोकळा कारभार चालवण्याची परवानगी कोणी दिली? का कारवाई होत नाही? का ग्रामीण आरोग्य यंत्रणा फक्त कागदावरच चालते आणि प्रत्यक्षात जनतेच्या जीवाशी खेळ चालतो?
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात असे अनेक अधिकारी फक्त पगार घेण्यासाठी बसले आहेत, पण आरोग्य विभागात हे अपराध्य आहे. कारण येथे एखाद्या गर्भवती महिलेची, आजारी मुलाची किंवा वृद्ध व्यक्तीची एक छोटी निष्काळजीपणा जिवंत जीव घेऊ शकतो.
प्रशासन आणि आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांना स्पष्ट प्रश्न आहेत
1) त्रिकोळी उपकेंद्रातील CHO विरुद्ध ठोस कारवाई कधी होणार?
2) ग्रामीण भागातील गरीब जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्याची हिंमत आहे का? की फक्त पगार वाटप करायचे आणि जनतेचे हाल चालू ठेवायचे?
महाराष्ट्र खाकी या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जर वरिष्ठ अधिकारी तात्काळ कारवाई करणार नसतील, तर आम्ही याच प्रकरणाला अधिक तीव्रतेने लाऊन धरणार



