महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत गुन्हेगारांवर पोलिसांनी मोठा प्रहार केला आहे. अवघ्या एका महिन्यात ७२१ गुन्हे दाखल, ७७८ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून १ कोटी २० लाख ५३ हजार ७१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
०१ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात धडक कारवाया राबविण्यात आल्या. या मोहिमेत अवैध दारू, जुगार, गांजा, गुटखा आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली.
कारवाईचा तपशील
🔹 दारूबंदी : ६२२ गुन्हे, ६३० आरोपी
🔹 जुगार : ७३ गुन्हे, १०६ आरोपी
🔹 गांजा : ३ गुन्हे, ३ आरोपी
🔹 गुटखा : १२ गुन्हे, २४ आरोपी
🔹 आर्म ॲक्ट : ११ गुन्हे, १५ आरोपी
याशिवाय संबंधित आरोपींवर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली असून, पुन्हा अवैध धंद्यांमध्ये सहभागी झाल्यास कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचा इशारा
“लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा धडक कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने आणि सातत्याने सुरू राहतील.”




