Home » Blog » NCP Sunetra Pawar: प्रफुल्ल पटेल, तटकरेंना डच्चू दिल्याने खळबळ; अखेर सुनेत्रा पवारांनी मौन सोडलं, पत्राबाबत केलं मोठं वक्तव्य | महाराष्ट्र बातम्या

NCP Sunetra Pawar: प्रफुल्ल पटेल, तटकरेंना डच्चू दिल्याने खळबळ; अखेर सुनेत्रा पवारांनी मौन सोडलं, पत्राबाबत केलं मोठं वक्तव्य | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:

NCP Sunetra Pawar Prafull Patel: कार्यकारणीच्या यादीतून प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांना वगळण्यात आले. यावरून गोंधळाची स्थिती निर्माण झाली असताना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारांनी थेट भाष्य केले.

प्रफुल्ल पटेल, तटकरेंना डच्चू दिल्याने खळबळ; अखेर सुनेत्रा पवारांनी मौन सोडलं, पत्राबाबत केलं मोठं वक्तव्य
प्रफुल्ल पटेल, तटकरेंना डच्चू दिल्याने खळबळ; अखेर सुनेत्रा पवारांनी मौन सोडलं, पत्राबाबत केलं मोठं वक्तव्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून पक्षात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वावरून विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर सुनेत्रा पवारांनी पक्षाची धुरा हाती घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीतील पक्षातंर्गत गटबाजीबाबत चर्चा सुरू होत्या. अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या कार्यकारणीच्या यादीतून प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांना वगळण्यात आले. यावरून गोंधळाची स्थिती निर्माण झाली असताना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारांनी थेट भाष्य केले.

केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या कार्यकारणीच्या यादीत प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांचे नाव नसल्याचे अनेकांच्या भुवया उंचवल्या असून चर्चांना उधाण आले आहे. तर, कार्यकारणीच्या यादीत सुनेत्रा पवारांसह पार्थ पवार, जय पवार यांचीदेखील वर्णी लावण्यात आली.

पटेल, भुजबळ, तटकरेंची गच्छंती

केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या या नव्या यादीत अनुभवी नेत्यांना डच्चू दिल्याने राष्ट्रवादीत आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचा राष्ट्रीय चेहरा राहिलेले प्रफुल पटेल यांना कार्यकारिणीतून वगळल्याने राजकीय विश्लेषकांनाही धक्का बसला आहे. पटेल यांनी २५ वर्षांहून अधिक काळ पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तर महाराष्ट्रातील पक्षाचे एकमेव लोकसभा खासदार सुनील तटकरे यांनाही सरचिटणीस पदावरून नाव वगळण्यात आले आहे. यासोबतच छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांची नावेही नवीन यादीतून गायब असल्याने, पक्षाने आपली जुनी फळी पूर्णपणे बाजूला केल्याचे स्पष्ट होत आहे.

सुनेत्रा पवार यांनी काय म्हटले?

राष्ट्रवादीच्या कार्यकारणीच्या यादीवरून गोंधळ उडाला असताना राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया देताना स्पष्टीकरण दिले आहे. सुनेत्रा पवार यांनी मध्यरात्री ट्वीट करून यादीवर प्रतिक्रिया दिली. माध्यमांमध्ये फिरत असलेली कार्यकारणीच्या यादीत त्रुटी असून त्यात बदल केले जाणार असल्याचे म्हटले. मात्र,केंद्रीय निवडणूक आयोगाला राष्ट्रवादीकडून २९ एप्रिल रोजी पत्र देण्यात आले होते.

आधीदेखील प्रिंटिंग मिस्टेक…

दरम्यान, काही महिनेआधी देखील राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष पदावरून प्रफुल पटेल यांचे नाव वगळण्यात आले होते. त्यावेळी देखील पटेल यांच्या नावा समोरील पद नमूद करणे नजरचुकीने राहिले असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले होते. आता पुन्हा एकदा चूक कशी झाली, हा योगायोग कसा जुळून आला यावर पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीत सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

NCP Sunetra Pawar: प्रफुल्ल पटेल, तटकरेंना डच्चू दिल्याने खळबळ; अखेर सुनेत्रा पवारांनी मौन सोडलं, पत्राबाबत केलं मोठं वक्तव्य

Share This News

Related Post

National