Home » पोलीस » LATUR POLICE 41 गुन्हे उघड करणाऱ्या कर्तव्यदक्ष PSI राजेश घाडगे यांचा नांदेड परिक्षेत्राचे IGP शहाजी उमाप यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव

LATUR POLICE 41 गुन्हे उघड करणाऱ्या कर्तव्यदक्ष PSI राजेश घाडगे यांचा नांदेड परिक्षेत्राचे IGP शहाजी उमाप यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – 41 गुन्हे उघड करणाऱ्या कर्तव्यदक्ष PSI राजेश घाडगे यांचा नांदेड परिक्षेत्राचे IGP शहाजी उमाप यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव, कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट तपासाचा आदर्श घालून देत लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस उपनिरीक्षक (PSI) राजेश घाडगे यांनी LCB पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत नांदेड परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी PSI राजेश घाडगे यांना विशेष प्रशंसापत्र देऊन सन्मानित केले असून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

PSI राजेश घाडगे यांनी उघड केलेल्या गुन्ह्याचा सविस्तर घटनाक्रम व तपास
रेणापूर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या (गु.र.नं. 400/2026, कलम 303 (2) भा.न्या.सं.) समांतर तपासादरम्यान PSI राजेश घाडगे यांनी आपल्या पथकासह अथक परिश्रम घेतले. कोणत्याही ठोस सुगाव्याशिवाय अंधारात असलेल्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी त्यांनी तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) आणि गोपनीय माहितीचा कुशलतेने वापर केला. या वेधक तपासाच्या आधारे पोलिसांनी ३ सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून लातूर जिल्ह्यातील जनावरे चोरीचे तब्बल २४ गुन्हे उघडकीस आणाlले या गुन्ह्यांमध्ये एकूण 24,68,000 रुपयांचा मुद्देमाल यशस्वीरित्या हस्तगत केला

PSI राजेश घाडगे यांचे अंतरजिल्हा गुन्हे तपासातही मोठे यश
केवळ लातूरच नव्हे, तर लगतच्या इतर जिल्ह्यांमध्येही जनावरे चोरीच्या घटनांचा पर्दाफाश करण्यात PSI घाडगे यांना मोठे यश आले आहे. यामध्ये नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा या विविध जिल्ह्यांमधील जनावरे चोरीचे आणखी 16 गुन्हे उघडकीस आले आहेत. अशा प्रकारे एकाच मोहिमेत एकूण 41 गुन्हे उघडकीस आणत त्यांनी अत्यंत तज्ज्ञ आणि प्रभावी पोलीस तपासाचे उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे.

PSI राजेश घाडगे यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव
अल्प काळात मोठ्या प्रमाणावर गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारीला आळा घालण्याच्या या कामगिरीबद्दल PSI राजेश घाडगे यांचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक आणि विविध स्तरातून हार्दिक अभिनंदन होत आहे. त्यांच्या या धडाडीच्या कामगिरीमुळे लातूर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Share This News

Related Post

National