महाराष्ट्र खाकी (लातूर/ विवेक जगताप) – लातूर मध्ये क्रिकेट च्या दहीहंडी IPL च्या “गोपाळ काल्याचा (सट्टा) प्रसाद (हप्ता)”मुळे दोन सामन्यात कोटीची उलाढाल तरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या कडून कारवाई नाही , “क्रिकेटची दहीहंडी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल सामन्यांची सुरुवात होताच लातूरमध्ये क्रिकेट सट्ट्याचा बाजार पुन्हा तेजीत आल्याचे चित्र समोर आले आहे. पहिल्या दोन सामन्यांतच शहरासह ग्रामीण भागात सट्ट्याची उलाढाल कोटींच्या घरात गेल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र इतक्या मोठ्या व्यवहारानंतरही लातूर पोलिसांची एकही ठोस कारवाई दिसून न आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दहीहंडीप्रमाणे “गोपाळ काल्याचा (सट्टा) प्रसाद (हप्ता)” वाटला जातो, त्याच धर्तीवर सट्ट्याच्या भाषेत ‘गोपाळ काल्याचा प्रसाद’ स्वरूपातील हप्त्यामुळेच हा बाजार निर्धास्तपणे सुरू असल्याची चर्चा आहे. या “गोपाळ काल्याचा (सट्टा) प्रसादा (हप्ता)”च्या ताकदी मुळे आयपीएलचा संपूर्ण हंगाम संपेपर्यंत पोलिस कारवाई होणार नाही का ? , असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाची सूत्रे IPS अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या हाती आल्यानंतर अनेक अवैध धंद्यांवर आळा बसल्याचे दिसले. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे उघडकीस आणण्याची धडाकेबाज कामगिरी झाली. परंतु क्रिकेट सट्ट्याच्या बाबतीत मात्र हीच तत्परता गायब झाल्याचे दिसत आहे.
पहिल्या दोन सामन्यांतच सट्टा बाजार कोटींच्या घरात गेला, यामागे “गोपाळ काल्याचा (सट्टा) प्रसाद (हप्ता)” संस्कृती कारणीभूत असल्याची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. नागरिकांची आर्थिक लूट सुरू असताना पोलिसांकडून मौन का?, हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे.
जर पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी खरोखरच मनावर घेतले, तर काही तासांत गुन्हे उकलणारी हीच LCB प्रमुख सुधाकर बावकर यांची यंत्रणा सट्टेबाजांवरही कारवाई करू शकते. “गोपाळ काल्याचा (सट्टा) प्रसाद (हप्ता)” घेणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली तरच लातूरमधील आयपीएल सट्टा बाजार थांबेल, अन्यथा हा बाजार दिवसेंदिवस वाढतच जाणार, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.








