महाराष्ट्र खाकी (औसा / विवेक जगताप) – औसा मतदारसंघाचा आणि विशेषता ओसा शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या ध्येय्याला पेटलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे आणि विश्वासू असलेले आणि राज्यात ज्यांची ओळख शॅडो मुख्यमंत्री म्हणुन असलेले आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने औसेकरांना विकास कामाच्या आधारावर आणि औसा शहराच्या विकासाला
विरोध करणाऱ्या अपप्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देऊन विकास करणाऱ्या भाजपाला आणि सहकारी पक्षांना साथ देण्याचे आवाहन करणारे एक पत्र लिहून साद घातली आहे. औसा शहरातील मतदार बंधू-भगिनींनो, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपरिषद – नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यात आपल्या औसा नगरपरिषदची सुद्धा निवडणूक पार पडणार आहे. 2 डिसेंबर
रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबरला आपल्या शहराला नवा नगराध्यक्ष मिळणार आहे. प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर आम्ही आणि आमचे उमेदवार, आजवर केलेल्या कामांचा लेखाजोखा आणि भविष्यात करावयाच्या कामांचा आराखडा घेऊन आपल्या भेटीला येऊच. पण लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात होत असताना मला आपल्या सर्वांना काही सांगायचे आहे. 2019 मध्ये आपण मला आमदार म्हणून सेवेची
संधी दिल्यापासून आजपर्यंत मी शहराचा कायापालट करण्यासाठी काम करत असल्याचे आपण सर्वजण पाहतच असाल, औसा शहराला माकणी धरणातून पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी 20-22 वर्ष जुनी होती, ती मागणी पूर्णत्वास नेली आणि शहराला प्रत्यक्षात माकणी धरणातून पाणीपुरवठा सुरू केला. औसा शहरात फक्त 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय होते, त्याला 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात दोंन्नत केले आणि
100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या 5 मजली इमारतीचे वायुवेगाने सुरु असलेले बांधकामही आपण पाहत असालच. राज्यातील कुठल्याही क दर्जाच्या शहरात नसेल असे अद्ययावत रुग्णालय आपण आपल्या औसा शहरात उभारत आहोत. 1. मुख्य मुख्य रस्ता टप्पा 3, जुने बसस्थानक ते उंबडगा रस्ता, ग्रामीण रुग्णालय ते रुग्णालय ते कारंजे खडी केंद्र रस्ता, नूतन बसस्थानक, वरिष्ठ स्तरीय दिवाणी न्यायालय, 14 स्वच्छतागृहे,
तक्षशिला बौद्धविहार अशी अनेक उल्लेखनीय कामे प्रत्यक्षात पूर्ण झाली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. शहरातील कोणताही प्रभाग घ्या; रस्ते व नाल्यांची काही कामे पूर्ण झाल्याचे, काही कामे प्रगतीपथावर असल्याचे आणि काही मंजूर कामे सुरू होण्याच्या मागविर असल्याचे प्रत्येक प्रभागात दिसून येईल. कसलाही भेदाभेद न करता 2019 पासून
अथकपणे शहराच्या चौफेर विकासासाठी काम करत आहे. एक आमदार म्हणून आजवर शेकडो कोटींची कामे शहरात केली, जर तुम्ही सोबतीला भाजपचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक दिले तर कामाचा झपाटा किती पटीने वाढेल याचाच फक्त आज विचार करा. तुमच्या पुढे 2 ठळक पर्याय येणार आहेत. एकीकडे आम्ही, कसलाही भेदाभेद न करता चौफेर विकासकामे करणारे तर दुसरीकडे विरोधक, क्रीडा संकुलला,
शॉपिंग कॉम्प्लेक्सला, मुख्य रस्त्याच्या तिसऱ्या टप्याला, स्वच्छतागृहांच्या बांधकामाला, शहराच्या विकास आराखड्याला आणि एकूणच शहरातील प्रत्येक चांगल्या कामाला विरोध करणारे. औसेकर मतदार बंधू – भगिनींनों; तुम्ही सर्वजण सुज आहात. शहराच्या विकासाला विरोध करणाऱ्या अपप्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देऊन आपण सर्वजण विकास करणाऱ्यांसोबत ताकदीने उभे राहाल याबद्दल माझ्या मनात तरी तिळमात्र शंका नाही. असे पत्र लिहून आमदार अभिमन्यू पवार यांनी ओसा शहरातील जनतेला साद घातली आहे.



