महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या अभ्यासपूर्ण नियोजनमुळेच GFC 3 स्टार व ODF ++ मानांकन मिळवत लातूरची सर्वोत्तम कामगिरी

महाराष्ट्र खाकी (दिल्ली) – केंद्र सरकारकडून केंद्रीय गृहनिर्माण तथा नगर विकास मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण-2021 चे राष्ट्रीय पुरस्कार  वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्री हरदिप सिंग पुरी, केंद्रिय गृहनिर्माण तथा नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर, छत्तीसगड़ राज्याचे मुख्यमंत्री, मनीपुर राज्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास सचिव दुर्गा प्रसाद मिश्रा हे मंचावर उपस्थित होते.

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रातील बऱ्याच शहराना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले त्यात मराठवाड्यातून एकमेव लातूर महानगरपालिकेचा समावेश होता. ही गोष्ट लातूरकरांसाठी अभिमानाची आहे. लातूरला हा मान मिळाला याचे श्रेय जाते ते महापौर विक्रांत गोजमगुंडे यांना कारण त्यांनी सतत शहरातील स्वच्छते विषयी नागरिकात जागृती निर्माण करण्याचे काम केले आणि नागरिकांनी त्याचे स्वागत ही केले.

सफाई कर्मचाऱ्यांचे आणि कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांचे नियोजन अभ्यासपूर्ण केले . महापौर पदाची सूत्र हाती घेतल्यापासून शहरात नवीन काय योजना आणता येतील, नागरिकांना सुविधा कशा देता येतील याच प्रयत्नात ते असतात . हा पुरस्कार घेण्यासाठी त्यांनी काही स्वच्छता कर्मचारी आणि स्वछता निरीक्षक यांना सोबत घेऊन गेले होते. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी नव विकासाचा विचारकरून जे प्रयत्न केले त्याच प्रयत्नामुळे आज हे यश आणि सन्मान लातूरला मिळवला आहे.

लातूर महानगरपालिकेला कचरामुक्त शहरांचे GFC 3 स्टार आणि ODF ++ मानांकन ” पुरस्कार प्राप्त करून देशात 38 वा क्रमांक मिळवला , देशात स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार पटकावून महाराष्ट्राच्या आणि लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. लातूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी स्वछता कर्मचारी लताताई रसाळ यांना हा पुरस्कार घेण्यासाठी मान दिला होता. स्वछता कर्मचारी लताताई रसाळ यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले .

हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी स्वछता कर्मचारी लताताई रसाळ यांना मान दिला या गोष्टीचे देशातील मान्यवरांनी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचे कौतुक केले