Home » महाराष्ट्र » पिंपरी-चिंचवडच्या कृष्णानगर येथील कोमल वाईन्स’मुळे मद्यपान-गुंडगिरीने हैराण नागरिक, सुरक्षा धोक्यात: मारुती जाधव आक्रमक, प्रशासनला थेट चेतावणी

पिंपरी-चिंचवडच्या कृष्णानगर येथील कोमल वाईन्स’मुळे मद्यपान-गुंडगिरीने हैराण नागरिक, सुरक्षा धोक्यात: मारुती जाधव आक्रमक, प्रशासनला थेट चेतावणी

महाराष्ट्र खाकी (पिंपरी – चिंचवड / विवेक जगताप ) – पिंपरी-चिंचवडच्या कृष्णानगर चौकात ‘कोमल वाईन्स’ हे दारू दुकान आता स्थानिकांच्या जगण्यावर थेट घाला घालत आहे! दिवस-रात्र मद्यपान, उघड धिंगाणा, शिवीगाळ आणि कोलमडलेली वाहतूक… संपूर्ण परिसर नरक बनला आहे. कृष्णानगर, कोयना नगर, शरद नगर, घरकुल, महात्मा फुले नगर आणि शिवाजी पार्क या दाट वस्तीत हा खुला गुंडगिरीचा प्रकार सुरू असताना प्रशासन मात्र डोळेझाक करत आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मारुती जाधव आगबबूला झाले आहेत.

महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि लहान मुलांची सुरक्षा पूर्णपणे धोक्यात आली आहे. उघड मद्यपान आणि गुंडगिरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई केली नाही तर नागरिक रस्त्यावर उतरतील, असा स्पष्ट आणि सज्जड इशारा देण्यात आला आहे. मारुती जाधव यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि चिखली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धडक लेखी निवेदन दिले. निवेदन देताना कर्मयोगी संत गाडगेबाबा जागृती मंचाचे अध्यक्ष यशवंत कन्हेरे, कोयना नगर कृती समितीचे उपाध्यक्ष रामचंद्र गुरव आणि इंगवले काका उपस्थित होते.

“प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी येऊन वस्तुस्थितीची पाहणी करावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करावी. पोलीस गस्त वाढवा आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण द्या. नागरिकांच्या सुरक्षिततेशी आणि सार्वजनिक शांततेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही”

Share This News

Related Post

National