महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – प्रेरणा होनराव यांना प्रभाग क्र 15 मध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे त्यांच्या कार्यामुळे आणि राजकीय, प्रशासकीय कामाचा आणि ओळखीमुळे प्रभागाचा सर्वांगीण विकास करू शकतात हा विश्वास मतदारांना आला आहे म्हणुन प्रेरणा होनराव उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्र. 15 मध्ये विकास, विश्वास आणि सक्षम नेतृत्व यांचे प्रभावी प्रतीक म्हणून प्रेरणा होनराव यांचे नाव ठळकपणे पुढे आले आहे. प्रभागातील सर्व स्तरातील नागरिकांकडून त्यांना मिळणारा वाढता, उत्स्फूर्त आणि आत्मविश्वासपूर्ण प्रतिसाद हे प्रभागाच्या भविष्यासाठी आशादायक चित्र निर्माण झाले आहे.

लातूर पॅटर्न (शिक्षण नगरी) म्हणून देशभर ओळख असलेल्या लातूरच्या हृदयस्थानी असलेला प्रभाग क्र. 15 हा केवळ भौगोलिक भाग नसून तो वैचारिक आणि बौद्धिक नेतृत्वाचा चेहरा आहे. अशा प्रभागासाठी तरुण, अभ्यासू, मेहनती आणि आधुनिक विचारसरणीचे नेतृत्व आवश्यक असून, ही जबाबदारी समर्थपणे पेलण्याची क्षमता प्रेरणा होनराव यांच्यात आहे, असा ठाम विश्वास मतदार व्यक्त करत आहेत.

प्रभागातील रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य सेवा या मूलभूत पण अत्यावश्यक सुविधांवर भर देत काम करणारा संवेदनशील आणि कार्यक्षम चेहरा म्हणून प्रेरणा होनराव यांची ओळख आहे. केवळ आश्वासनांवर नव्हे तर प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहत आहेत.

राज्य सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा या दोन्ही स्तरांवर प्रभावी समन्वय साधून विकासकामे मार्गी लावण्याची ताकद प्रेरणा होनराव यांच्याकडे आहे. मागील तीन वर्षांपासून भारतीय जनता पार्टीच्या राज्य प्रवक्त्या म्हणून कार्यरत असताना त्यांनी मिळवलेला राजकीय अनुभव, प्रशासकीय जाण आणि संपर्कांचा व्यापक पट प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णायक ठरणार असल्याचे मत नागरिक मांडत आहेत.

एकूणच प्रभाग क्र. 15 मध्ये “विकास हवा, सक्षम नेतृत्व हवे” या भावनेचे प्रतिबिंब प्रेरणा होनराव यांच्या वाढत्या लोकप्रियतेत स्पष्टपणे दिसून येत आहे, या सकारात्मक जनलाटेमुळे प्रभागात विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार असल्याचा विश्वास मतदारामध्ये निर्माण झाला आहे.




