Home » प्रशासकीय » वेरूळ-घृष्णेश्वर परिसरात जागतिक दर्जाची स्वच्छता राखण्याचे आवाहन – विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

वेरूळ-घृष्णेश्वर परिसरात जागतिक दर्जाची स्वच्छता राखण्याचे आवाहन – विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

महाराष्ट्र खाकी (छत्रपती संभाजीनगर / विवेक जगताप ) – वेरूळ-घृष्णेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता राखणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी असल्याचे सांगत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत (भा.प्र.से.) यांनी जागतिक दर्जाची स्वच्छता राखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत पुढील वर्षीच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटक व भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी, घनकचरा प्रक्रिया केंद्रासाठी तातडीने डीपीआर तयार करणे, अतिरिक्त मनुष्यबळाद्वारे कचरा संकलन, परिसर सुशोभीकरण, जनजागृती आणि दंडात्मक कारवाई राबविण्याचे निर्देश देण्यात आले.

तसेच ओला-सुका कचरा वर्गीकरण, पुनर्वापराला प्रोत्साहन आणि महिला बचत गटांचा सहभाग वाढविण्यावरही विशेष भर देण्यात आला. बैठकीस जिल्हाधिकारी  विनय गौडा जी. सी., मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी. एम., अपर आयुक्त विकास श्रीमती सुषमा देसाई तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. ‘स्वच्छ वेरूळ – घृष्णेश्वर परिसर, जागतिक दर्जाचा धार्मिक व पर्यटन अनुभव’ हा उद्देश समोर ठेवत सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Share This News

Related Post

National