महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूरची अभिमानाची घडी! रिलायन्स लातूर पॅटर्नने NEET-UG 2026 मध्ये रचला इतिहास, देशाच्या वैद्यकीय प्रवेशाच्या सर्वात कठीण आणि स्वप्नवत परीक्षेत रिलायन्स लातूर पॅटर्नने पुन्हा एकदा लातूरचा शैक्षणिक गौरव जगभरात रोशन केला आहे श्री. संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट, लातूर संचलित श्री. त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय तथा रिलायन्स लातूर पॅटर्नने NEET-UG 2026 मध्ये दमदार कामगिरी करत ‘लातूर पॅटर्न’ची परंपरा नवी उंची दिली आहे. कठोर मेहनत, आधुनिक शिक्षणपद्धती आणि अथक मार्गदर्शन यांच्या जोरावर संस्थेने यंदाही गुणवत्तेचा नवा कीर्तिमान प्रस्थापित केला
घवघवीत यश घेऊणारे चमकते तारे
उदय शिंदे – ६२३ गुण (संस्थेत प्रथम क्रमांक)
सिद्धी सपकाळ – ५७४ गुण (द्वितीय क्रमांक)
वेदांत काटकर – ५७३ गुण (तृतीय क्रमांक)
रिलायन्स लातूर पॅटर्न आकडेवारी
६००+ गुण: १ विद्यार्थी
५५०+ गुण: ७ विद्यार्थी
५००+ गुण: १३ विद्यार्थी
यंदा देशभरातून २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी NEET-UG परीक्षेला सामोरे गेले, त्यातून केवळ ११.२१ लाख विद्यार्थी पात्र ठरले. या प्रचंड स्पर्धेत रिलायन्स लातूर पॅटर्नच्या १५३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत संस्थेचा डंका वाजवला. रिलायन्स लातूर पॅटर्नचे अध्यक्ष प्रा. उमाकांत होनराव, सचिव व प्राचार्या सौ. सुलक्षणा केवळराम आणि कार्यकारी संचालक ओंकार होनराव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत म्हणाले, “हे यश केवळ विद्यार्थ्यांचे नाही, तर संपूर्ण टीमच्या समन्वयाचे, शिस्तीचे आणि स्वप्नपूर्तीच्या जिद्दीचे आहे.”
संस्थेच्या अनुभवी शिक्षक, नियमित चाचण्या, वैयक्तिक मार्गदर्शन आणि सकारात्मक वातावरणामुळे विद्यार्थी केवळ परीक्षेत यशस्वी होत नाहीत तर स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचीही झलक दाखवतात. हेच रिलायन्स लातूर पॅटर्नचे खरे वैशिष्ट्य आहे. रिलायन्स लातूर पॅटर्नने पुन्हा सिद्ध करत आहे की, यश हे योगायोग नसते – ते शिस्त, परिश्रम आणि सातत्य यांचा परिणाम असते




