पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी महायुतीला साथ देत पुन्हा एकदा राज्याची सत्ता हाती द्या – आ.संभाजीराव पाटील निलंगेकर

महाराष्ट्र खाकी ( निलंगा/प्रतिनिधी ) – महायुतीने समाजातील सर्व घटकांना समोर ठेवून विविध योजना आखल्या व राबवल्या आहेत.या योजना अधिक ताकदीने व गतीने यापुढेही राबविल्या जाणार आहेत. आपल्या पुढच्या पिढ्यांनाही सुखी,समृद्ध जीवन जगता यावे यासाठी देशाचा,राज्याचा व मतदारसंघाचा विकास होणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी महायुतीला साथ देत पुन्हा एकदा राज्याची सत्ता हाती

द्या.निलंगा मतदारसंघातूनही महायुतीच्या विजयासाठी कमळाचे बटन दाबा असे आवाहन माजीमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने आ.संभाजीराव पाटील निलंगेकरयांनी सुरू केलेली आशीर्वाद यात्रा बुधवारी धनगरवाडी कवठाळा,विळेगाव येथे पोहोचली. ठिकठिकाणी नागरिकांना संबोधित करताना आ.निलंगेकर बोलत होते. उपस्थितांशी संवाद साधताना आ.निलंगेकर

म्हणाले की,निलंगा मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासकामे झाली आहेत.विकास प्रत्येक घरापर्यंत पोहोचला आहे. नागरिकांचे जीवनमान सुधारले असून तरुणांना रोजगार,महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण यावर काम सुरू आहे. मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावणे हे आपले ध्येय असल्याचे आ. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले. नागरिकांची एकी, विश्वास आणि प्रेमामुळेच निलंगा

मतदारसंघ विकासाच्या वाटेवर धावत आहे.ही निवडणूक मतदारसंघाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.त्यामुळे सर्वांनी सावध राहत विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडता मतदान करावे,असेही आ.संभाजीराव पाटील निलंगेकरम्हणाले. महायुतीने राज्याच्या विकासाचे निर्णय घेतले त्याच पद्धतीने मतदारसंघातील जनतेसाठी आपण कायमच काम करत आहोत. जनहिताच्या योजना आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचेही आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी यात्रेदरम्यान बोलताना सांगितले.

Recent Posts